MI vs CSK: पुन्हा दिसली 'धोनी रिव्ह्यू सिस्टीम'ची जादू अन् सूर्या एका धावेतच झाकोळला, पाहा Video

Video: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा धोनीने अचूक रिव्ह्यू घेतल्याचे दिसले, त्यामुळे सूर्यकुमारला विकेटही गमवावी लागली.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni DRS: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने आले. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईने सीएसकेसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने घेतलेल्या एका रिव्ह्यूची जोरदार चर्चा होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतर रोहित तुषार देशपांडेविरुद्ध 21 धावांवर त्रिफळाचीत झाला, तर ईशानला रविंद्र जडेजाने 7 व्या षटकात 32 धावांवर बाद केले.

MS Dhoni
IPL 2023 Video: एका ओव्हरमध्ये 5 चौकार अन् 25 चेंडूत फिफ्टी! जयस्वालची DC विरुद्ध तोडफोड बॅटिंग

त्यानंतर 8 व्या षटकात मिचेल सँटेनर गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण तो चूकला आणि चेंडू त्याच्या मागे गेला, जो यष्टीरक्षण करणाऱ्या धोनीने पकडला होता. त्यावर धोनीने विकेटसाठी अपील केले.

त्यानंतर सूर्यकुमार परत चालला देखील होता, मात्र पंचांनी चेंडू वाईड असल्याचा निर्णय दिला, त्यामुळे तो थांबला. मात्र धोनीने पूर्ण आत्मविश्वासाने लगेचच डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमची मागणी केली (डीआरएस). यामध्ये दिसले की चेंडू सूर्यकुमारच्या ग्लव्ह्जला लागला आहे, त्यामुळे तो झेलबाद झाला असल्याचे स्पष्ट झाले. अखेर पंचांना निर्णय बदलावा लागला आणि सूर्यकुमारला केवळ एक धाव करून विकेट गमवावी लागली.

MS Dhoni
IPL 2023: 'सुदैवाने किंवा दुर्दैवाने, धोनी जाईल तिथे...', CSK विरुद्धच्या मॅचआधी पोलार्डची मोठी प्रतिक्रिया

दरम्यान, धोनीने आत्मविश्वासाने घेतलेल्या या रिव्ह्यूचा व्हिडिओ व्हायरल होत असून सध्या 'धोनी रिव्ह्यू सिस्टीम' हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. खरंतर धोनी अनेकदा असे डीआरएस अचूक घेताना दिसतो. त्यामुळे अनेकदा क्रिकेट चाहत्यांकडून डीआरएसला डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम ऐवजी धोनी रिव्ह्यू सिस्टीम असे म्हटले जाते. यावेळीही धोनीने अचूक रिव्ह्यू घेतल्याने 'धोनी रिव्ह्यू सिस्टीम' ट्रेंडमध्ये आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास सूर्यकुमार बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वर्मा 22 धावांवर आणि डेव्हिड 31 धावांवर बाद झाला. याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही करता आले नाही. त्यामुळे मुंबईचा संघ 20 षटकात 8 बाद 157 धावा करू शकला.

सीएसकेकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल सँटेनर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच सिसांडा मंगलाने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com