Video Viral: आंद्रे रसेलने मैदानावर डान्स करून केले चाहत्यांचे मनोरंजन

केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल या सामन्यात प्रसिद्धीच्या झोतात आला.
Andre Russell
Andre RussellTwitter
Published on
Updated on

आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 गडी राखून पराभव केला आणि त्यांच्या खात्यात दोन महत्त्वाचे गुण जमा केले. या विजयासह श्रेयस अय्यरच्या संघाने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या असल्या तरी केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) या सामन्यात (IPL) प्रसिद्धीच्या झोतात आला. (IPL 2022 KKR vs RR)

Andre Russell
'...IPL चा 9 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला,' धोनी बनला नंबर वन

होय, राजस्थान आणि कोलकाता यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान एक रंजक दृश्य पाहायला मिळाले जिथे कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल थेट सामन्यादरम्यान डान्स करताना दिसला. बॉंड्रीवर रसेलच्या डान्स स्टेप पाहून चाहतेही वेडे झाले. रसेलचा हा एंटरटेनमेंट तडका सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोकं त्याला पसंतही करत आहेत. अनेक चाहते त्यावर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 152 धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने 54 धावांची खेळी केली. त्याचवेळी संजूशिवाय शिमरॉन हेटमायरनेही फलंदाजी करताना नाबाद 27 धावा केल्या. मात्र, रिंकू सिंगच्या फिनिशिंग इनिंगने या दोन फलंदाजांच्या फलंदाजीवर दबाव पडला.

Andre Russell
जीसीए प्रीमियर लीग: धेंपो क्लबची वाटचाल विजयाच्या दिशेने

रिंकूने 23 चेंडूत 42 धावांची शानदार खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. या विजयासह KKR संघ पुन्हा एकदा स्पर्धेत आला आहे. या विजयानंतर कोलकाताचे 10 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत आता हा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com