आयपीएल 2022 च्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) टूर्नामेंट सुरु होण्याच्या 2 दिवस आधी संघाचे कर्णधारपद सोडले. त्याच्या जागी त्याने स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) कमान सोपवली होती. मात्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही, त्यामुळे हंगामाच्या मध्यावर संघाने पुन्हा चकित केले. जडेजाने कर्णधारपद सोडले आणि पुन्हा धोनीला संघाची जबाबदारी स्वीकारावी लागली. या दुसऱ्या निर्णयाने आयपीएलमधील एक विक्रमही मोडला आहे. (Mahendra Singh Dhoni breaks Rahul Dravid's 9 year old record)
दरम्यान, 1 मे रोजी SRH विरुद्धच्या सामन्यात IPL 2022 मध्ये धोनीने प्रथमच कर्णधारपद भूषवले, अशा प्रकारे IPL च्या इतिहासातील तो सर्वात वयस्कर कर्णधार बनला. धोनीने माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा 9 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. 2013 मध्ये शेवटचा आयपीएल खेळलेला द्रविड राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार होता आणि शेवटच्या सामन्याच्या वेळी त्याचे वय 40 वर्षे 268 दिवस होते. धोनी जेव्हा SRH विरुद्ध कर्णधारपदासाठी आला तेव्हा त्याचे वय 40 वर्षे 298 दिवस होते. त्यामुळे हा विक्रम आता धोनीच्या नावावर झाला.
तसेच, धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ कर्णधार राहिला आहे. 2008 मध्ये स्पर्धेच्या सुरुवातीपासून तो कर्णधार आहे. केवळ 2017 च्या मोसमात त्याने पुणे संघाचे नेतृत्व केले नाही. आतापर्यंत त्याने 205 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्यात 122 विजय त्याच्या खात्यात जमा झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.