जीसीए प्रीमियर लीग: धेंपो क्लबची वाटचाल विजयाच्या दिशेने

चौगुले संघाची दाणादाण, साळगावकर क्लबचे एमसीसीवर वर्चस्व
Dhempo Club
Dhempo ClubDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मोठ्या विजयासह उपांत्य फेरी गाठण्याच्या दिशेने धेंपो क्रिकेट क्लबने कूच केली आहे. चौगुले स्पोर्टस क्लबची दुसऱ्या डावात 7 बाद 39 अशी दाणादाण उडाल्यामुळे त्यांची स्थिती नाजूक बनली. धेंपो क्लब अजूनही 87 धावांनी पुढे असल्यामुळे त्यांना विजयाची चाहूल लागली.(Dhempo Club's journey towards victory)

Dhempo Club
सोनसोडो येथील जमीन होणार कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या स्वाधीन

स्पर्धेतील आणखी एका सामन्यात सोमवारी सांगे येथील जीसीए मैदानावर साळगावकर क्लबच्या सर्वबाद 386 धावांना उत्तर देताना गतविजेत्या एमसीसी संघाची दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 177 अशी घसरगुंडी उडाली. फिरकी गोलंदाज धीरज यादवने (4-63) एमसीसी संघाला नियमित अंतराने धक्के दिले. साळगावकर संघ 209 धावांनी पुढे असल्यामुळे त्यांना आघाडीची चांगली संधी आहे. साळगावकर क्लबच्या डावात कालचा नाबाद शतकवीर वैभव नाईक (141) व रोहित धारेश्वर (42) यांनी सहाव्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केल्यामुळे त्यांचा डाव लांबला.

Dhempo Club
मडगाव येथील जिमनॅस्टिक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर करण वशोदिया याच्या अर्धशतकानंतर योगेश कवठणकर (69) याने चिवट फलंदाजी केली. त्यामुळे धेंपो क्लबला पहिल्या डावात 126 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. योगेशने 121 चेंडूंतील खेळीत सहा चौकार मारले.

संक्षिप्त धावफलक

चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव :187 व दुसरा डाव : 24 षटकांत 7 बाद 39 (दर्शन मिसाळ 11, इझान शेख नाबाद 10, जगदीश पाटील 2-4, फरदीन खान 1-18, विकास सिंग 2-5) विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 81 षटकांत सर्वबाद 313 (करण वशोदिया 78, स्नेहल कवठणकर 26, कीनन वाझ 10, योगेश कवठणकर 69, विकास सिंग 31, मलिक सिरूर 26, हर्षद गडेकर 28, जगदीश पाटील नाबाद 10, फेलिक्स आलेमाव 4-105, दर्शन मिसाळ 2-79, कृष्णन उन्नी 3-56, शुभम देसाई 1-26).

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव (5 बाद 286 वरून) : 121.3 षटकांत सर्वबाद 386 (वैभव नाईक 141, रोहित धारेश्वर 42, धीरज यादव 18, विजेश प्रभुदेसाई 2-69, हेरंब परब 1-50, दीप कसवणकर 2-100, कौशल हट्टंगडी 1-33, विश्वंबर काहलोन 1-30, वैभव गोवेकर 1-38) विरुद्ध एमसीसी, पहिला डाव : 52 षटकांत 7 बाद 177 (मंथन खुटकर 10, दीप कसवणकर 34, वैभव गोवेकर 44, विश्वंबर काहलोन 15, शिवेंद्र भुजबळ नाबाद 26, साईश कामत 36, शुभम तारी 2-50, धीरज यादव 4-63).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com