katya Coelho won Gold Medal: राष्ट्रीय सेलिंग स्पर्धेत 'गोव्या'ला सुवर्ण पदक

मुंबई येथे पार पडली स्पर्धा
International Sailor katya
International Sailor katyaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याची आंतरराष्ट्रीय सेलर कात्या कुएल्हो हिने राष्ट्रीय सीनियर सेलिंग आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतील पहिल्या फेरीत महिलांच्या आयक्यू फॉईल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही स्पर्धा मुंबई येथे पार पडली.

(International sailor 'Katya Cuelho' wins gold medal in IQ foil category at Asian Games selection trials)

International Sailor katya
Goa VS Arunachal Pradesh: दुबळ्या 'अरुणाचल'वर 'गोव्या'चा एकतर्फी विजय

राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कामगिरीमुळे चीनमधील आशियाई स्पर्धेसाठी कात्या हिचा भारतीय संघातील निवडीचा दावा आणखी भक्कम झाला आहे. कात्या हिने यापूर्वीही भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांत प्रतिनिधित्व केले आहे.

यामध्ये युवा ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धेचा समावेश आहे. युवा राष्ट्रीय स्पर्धेत सलग ब्राँझपदके जिंकलेल्या गोव्याच्या पर्ल कोलवाळकर हिला सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक तीन गुणांनी हुकले. तिला चौथा क्रमांक मिळाला.

International Sailor katya
IND vs NZ 3rd T20, Live Streaming: तिसरा T20 सामना केव्हा अन् कुठे होणार; पाहा संपूर्ण Details

गोव्याचा पुरुष गटातील प्रमुख सेलर डेन कुएल्हो याला आजारपणाचा फटका बसला. मुंबईतील स्पर्धेस तीन दिवस बाकी असताना आरोग्य चाचणीत तो डेंग्यूग्रस्त असल्याचे निदान झाले, त्यामुळे तो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही.

यावर्षी मे महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी डेन व कात्या या कुएल्हो भावंडांनी पात्रता मिळविली होती, मात्र चीनमधील स्पर्धा 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता राष्ट्रीय संघाची नव्याने निवड चाचणी प्रक्रिया घेण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com