IND vs AUS: भारताविरुद्ध ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा, स्मिथ-कमिन्ससह 'या' दिग्गजांचेही कमबॅक

Australia tour of India: भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Australia Team
Australia TeamDainik Gomantak

Australia announced squad for the ODI series against India:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात 22 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.

वर्ल्डकपपूर्वी होणारी ही या दोन्ही संघांची अखेरची वनडे मालिका आहे. त्यामुळे ही मालिका वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाची राहणार आहे. या मालिकेलाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १८ जणांचा संघ घोषित केला असून अनेक अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे.

ऑस्ट्रेलिया संघात कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल अशा खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. हे खेळाडू दुखापतीतून सावरल्यानंतर आता भारतीय संघाविरुद्ध पुनरागमन करताना दिसतील.

Australia Team
Asia Cup 2023: श्रीलंकेचा 129 चेंडूत पराभव करत टीम इंडियाने रचला विक्रमांचा मनोरा, पाहा कोणते केले पराक्रम

स्मिथ, स्टार्क, कमिन्स ऍशेस मालिकेनंतर दुखापतीमुळे संघातून बाहेर होते. तर ग्लेन मॅक्सवेललाही दुखापत झाली होती, तसेच तो त्याच्या मुलाच्या जन्मामुळे संघातून बाहेर होता.

कॅमरॉन ग्रीनही कन्कशनमधून पूर्ण सावरला असून त्याचाही ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, ऍश्टन एगार आणि ट्रेविस हेड यांचा मात्र संघात समावेश नाही.

एगारला पोटरीमध्ये छोटी दुखापत होती, तसेच तो त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलियाला परत गेला आहे. हेडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळताना हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याच्यासमोर आता वर्ल्डकपपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्याचे आव्हान असणार आहे.

Australia Team
IND vs AUS: भारी योगायोग! फक्त रोहितच नाही, तर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचीही WTC Final मध्ये 'स्पेशल फिफ्टी'

दरम्यान भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात मॅथ्यू शॉर्ट आणि स्पेन्सर जॉन्सन या युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सिन ऍबॉट, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा

भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया वनडे मालिकेचा वेळापत्रक

22 सप्टेंबर 2023 - पहिला वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

24 सप्टेंबर 2023 - दुसरा वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

27 सप्टेंबर 2023 - तिसरा वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com