IND vs NZ :‘मेरी मर्जी’… कसोटी सामन्यावेळी प्रेक्षकाचे 'गुटखा प्रेम' व्हायरल

मॅच बघायला आलेला एक प्रेक्षक या व्हिडिओमध्ये फोनवर बोलताना दिसत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे आहेत की लोक त्याची थट्टा करताना थकत नाहीत.
Pan-masala
Pan-masalaDainik Gomantak
Published on
Updated on

ग्रीनपार्कमध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India v New Zealand) क्रिकेट सामन्यादरम्यान, कालपासुन सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून प्रत्येकजण गमताशीर प्रतिक्रिया देत आहे. मॅच बघायला आलेला एक प्रेक्षक या व्हिडिओमध्ये फोनवर बोलताना दिसत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे आहेत की लोक त्याची थट्टा करताना थकत नाहीत. या फोटोत आणि त्याच्या व्हिडिओ क्लिपबाबत सोशल मीडियाच्या सर्वच मंचांवर मीम्सचा महापूर आला आहे.

यावर कवी डॉ.कुमार विश्वास यांनीही फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी, ही मॅच कानपुरमध्ये (Kanpur) आहे... असे लिहून काही इमोजी आयकॉनसह आपली प्रतिक्रिया दिली. कुमार विश्वास यांनी हे फुटेज शेअर करताच ते लोकांनी वेगाने रिट्विट करत त्यात अनेक गंमतीशीर गोष्टी लिहिल्या आहेत.

Pan-masala
अॅशेस मालिकेआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, पॅट कमिन्सची कर्णधारपदी निवड

हा फोटो व्हायरल होताच लोक क्रिकेट फॅन्सला पान-मसाला (Pan-masala) किंवा गुटखा खाणारे असे म्हणत एक मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

गुटखा उत्पादनाची टॅगलाईन लिहित फेसबुकवर एका यूजरने म्हणले की, कानपूरमध्ये आपले स्वागत आहे, बोलो जुबां केसरी.

आणखी एका युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, #IndiaVsNewZealand...........कानपूर टेस्ट

एका युजरने तर गुड... गुटखा सोबत घेऊन या, इथे खुप महाग विकला जातो.

ग्रीनपार्क स्टेडियमवर (Stadium) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा क्रिकेट कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी झडती घेत त्यांच्याकडून सिगारेट-गुटखा, पाण्याच्या बाटल्या अगदी पिशव्या देखील काढून घेतल्या. अशा परिस्थितीत इतर शहरातून सामने पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेटप्रेमींना त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक जण सामान आत नेण्यास विनंती करत होते, मात्र त्यांचे ऐकले गेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com