Women's Boxing Championships: भारताच्या निखत, नीतू, लवलिनाची फायनलमध्ये धडक! पदकही पक्के

नवी दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या Women's Boxing Championships स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सने वर्चस्व ठेवले आहे.
Lovlina Borgohain
Lovlina BorgohainDainik Gomantak
Published on
Updated on

Women's World Boxing Championships 2023: जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सध्या सुरू आहे. यास्पर्धेत भारतीय बॉक्सर्सने शानदार कामगिरी केली आहे. भारताची गतविश्वविजेती निखत झरिन, राष्ट्रकुल पदक विजेती नीतू घंघास यांच्याबरोबरच लवलिना बोर्गोहेन आणि स्विटी बुरा यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत पदक निश्चित केले आहे.

निखतने साजेसा खेळ करत उपांत्य फेरीत कोलंबियाच्या इंग्रित वेलेन्सियाविरुद्ध 50 किलोग्रॅम वजनी गटात 5-0 असा सहज विजय मिळवला. तिने या सामन्यात पूर्ण वर्चस्व ठेवले होते. तसेच नीतूने 48 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या अलुआ बाल्किबेकोवाला 5-2 फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली.

Lovlina Borgohain
National Women Football: गोव्याच्या महिलांचा पहिला सामना शनिवारी राजस्थानविरुद्ध

लवलिनाने चीनच्या ली कियानला 75 किलो वजनी गटात 4-1 असे पराभूत केले आणि अंतिम सामना गाठला. त्याचबरोबर स्विटीने 81किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या स्यु-एमा ग्रीनट्री हिला 4-3 अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

नीतूला करावा लागला संघर्ष

नीतूला गेल्या तीन सामन्यांमध्ये आरएससी पद्धतीने म्हणजेच रेफ्रीकडून सामना थांबवल्यानंतर विजय मिळाला होता. पण यानंतर उपांत्य सामन्यात तिला तगडे आव्हान मिळाले. बाल्किबोवाने रक्षात्मक पवित्रा स्विकारत टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता, पण 22 वर्षीय नीतू तिला भारी पडली. नीतूच्या तुलनेत निखत, लवलिना आणि स्विटीने सहज सामना जिंकला.

Lovlina Borgohain
Women’s Boxing Championship: दिल्लीत होणाऱ्या बॉक्सिंग चॅम्पियनशीपवर युक्रेनचाही बहिष्कार, 'हे' आहे मोठे कारण

दरम्यान, अंतिम सामने शनिवारी आणि रविवारी खेळवले जाणार आहेत. नीतूचा सामना शनिवारी 2022 च्या एशियन चॅम्पियनशीपमधील कांस्यपदक विजेत्या मंगोलियाच्या लुत्सेखान अल्तांसेटसेगविरुद्ध होईल. तसेच निखतचा अंतिम सामना व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमविरुद्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com