National Women Football: गोव्याच्या महिलांचा पहिला सामना शनिवारी राजस्थानविरुद्ध

आंध्र प्रदेश, ओडिशाविरोधातही लढती
file photo
file photo Dainik Gomantak

27th National Senior Women Football Competition : सीनियर महिला 27व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील गट तीनमधील सामने दक्षिण गोव्यात होणार असून यजमान संघाची घरच्या मैदानावरील मोहीम शनिवारपासून (ता. 25) सुरू होईल. त्यांचा पहिला सामना राजस्थानविरुद्ध खेळला जाईल. यावेळी गोव्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्पर्धेचे उद्‍घाटन करतील. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव डॉ. शाजी प्रभाकरन यांची उपस्थिती असेल.

file photo
IPL 2023 मध्ये 'या' विस्फोटक खेळाडूंची होणार एन्ट्री! तिघांपैकी एकाचे नशीब फळफळणार

त्यानंतर गोवा व राजस्थान यांच्यातील सामना होईल. आंध्र प्रदेश, ओडिशा व हिमाचल प्रदेश हे गट तीनमधील अन्य संघ आहेत. दोन एप्रिलपर्यंत गोव्यात सामने खेळले जातील. सामने सकाळी नऊ वाजता व संध्याकाळी चार वाजता खेळले जातील.

गोव्याचा संघ जाहीर

खेळाडू ः प्रीती केसरकर, अशिका गडेकर, ज्योस्लिन डिसोझा, स्किंदिया सौंदत्तीकर, कुलसुम शेख, लॉरा एस्तिबेरो, माल्विता मास्कारेन्हास, रिया पिरीस, नुसरत कोटेवाले, अलिशा तावारीस, व्हेलानी फर्नांडिस, अर्पिता पेडणेकर, वालंका डिसोझा, नमिता गोवेकर, सुश्मिता जाधव, पुष्पा परब, जॉयव्ही फर्नांडिस, रिझेला सिया आल्मेदा, कॅरेन एस्ट्रोसियो, ॲनिएला बार्रेटो, जौझिमा फर्नांडिस, फ्लानी कॉस्ता.

अधिकारी ः मुख्य प्रशिक्षक ः गिरिजादेवी देसाई, सहाय्यक प्रशिक्षक ः ग्रेसी डिकॉस्ता, फिजिओथेरापिस्ट ः स्नेहा धारगळकर, व्यवस्थापक ः कॉस्मे ऑलिव्हेरा.

file photo
Rohit Sharma: 'फ्रँचायझींनी विकत घेतलंय...', रोहितचं IPL मध्ये खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल मोठं भाष्य

सामन्यांचे वेळापत्रक

  • 25 मार्च ः आंध्र प्रदेश विरुद्ध ओडिशा, राजस्थान विरुद्ध गोवा

  • 27 मार्च ः ओडिशा विरुद्ध हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश विरुद्ध राजस्थान

  • 29 मार्च ः हिमाचल प्रदेश विरुद्ध गोवा, ओडिशा विरुद्ध राजस्थान

  • 31 मार्च ः राजस्थान विरुद्ध हिमाचल प्रदेश, गोवा विरुद्ध आंध्र प्रदेश

  • 2 एप्रिल ः हिमाचल प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश, गोवा विरुद्ध ओडिशा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com