Women’s Boxing Championship: दिल्लीत होणाऱ्या बॉक्सिंग चॅम्पियनशीपवर युक्रेनचाही बहिष्कार, 'हे' आहे मोठे कारण

दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱ्या महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेवर युक्रेनसह अनेक देशांनी बहिष्कार टाकला आहे.
Boxing
BoxingDainik Gomantak

Women’s Boxing World Championship: भारताची राजधानी दिल्ली येथे 15 ते 26 मार्च दरम्यान महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्याआधीच काही वाद सुरू आहेत. या स्पर्धेवर अनेक देशांनी बहिष्कार टाकला असून यात आता युक्रेनचाही समावेश झाला आहे. रशिया आणि बेलारुसमधील बॉक्सरचा समावेश हे या बहिष्कारामागेचे कारण आहे.

दरम्यान, युक्रेन पुरुष बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेतही भाग घेणार नाहीये. याबद्दल युक्रेनच्या बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष ओलेग इल्चेन्को यांनी माहिती दिली आहे. त्यांनी युक्रेनमधील सस्पिलने स्पोर्ट्स वेबसाईटला माहिती दिली आहे की आक्रमक देशांच्याबरोबर एकाच मंचावर त्यांचे बॉक्सर स्पर्धा करणार नाहीत.

Boxing
ISSF Shooting World Cup: इजिप्तमधून आली मोठी बातमी, 'या' स्टार खेळाडूने जिंकले सुवर्णपदक

इल्चेन्को यांनी म्हटले आहे की 'आमचे उत्तर स्पष्ट आहे. आमचे खेळाडू आणि युक्रेनच्या बॉक्सिंग फेडरेशनचे प्रतिनिधी आक्रमक देशांचे म्हणजेच रशिया आणि बेलारूस देशांचे प्रतिनिधी जेथे असतील तिथे कोणतेही प्रदर्शन करणार नाही.'

खरंतर गेल्यावर्षी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. या आक्रमणाला 24 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. याच आक्रमणामुळे आधीच अडचणीत असलेले आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशन आणखी संकटात सापडले आहे. कारण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्षपद सध्या उमर क्रेमलेव्ह यांच्याकडे आहे. त्यांना व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक देखील समजले जाते.

त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या शिफारशी विरोधात जाऊन रशिया आणि बेलारुसच्या बॉक्सरवरील स्वत:च्या ध्वजाखाली स्पर्धा करण्यावरील बंदी उठवली होती. त्यामुळे या देशातील बॉक्सर देशांच्या ध्वजाखाली स्पर्धा करू शकतील.

Boxing
Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात आज सेमीफायनलचा थरार! कुठे अन् केव्हा पाहाणार मॅच, घ्या जाणून

दरम्यान, युक्रेनव्यतिरिक्त रशिया आणि बेलारुसच्या बॉक्सरच्या समावेशाच्या कारणाने अमेरिका, ब्रिटन, स्वित्झर्लंड, पोलंड, कॅनडा, चेक प्रजासत्ताक, आयर्लंड, नेदरलँड्स, स्विडन अशा अनेक देशांनी महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेतून माघार घेतली आहे.

महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप 2023 स्पर्धा नवी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये होणार आहे. पण आता या स्पर्धेत किती स्पर्धक खेळतील याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com