नाशिक: आजवर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात कमालीची कामगिरी केली आहे. शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आणि संपूर्ण देशाने याची दखलही घेतली आहे. यातच आता नाशिकमधील दोन बहीणींनी उज्ज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे नाव उंच केले आहे.
नाशिकमधील सिन्नर येथील दोन सख्ख्या बहिणींनी 'इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-2021' ('Indian Open Grappling Wrestling Championship-2021) मध्ये अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळवले आहे. आकांक्षा कृष्णाजी खामकर आणि कावेरी कृष्णाजी खामकर अशी या दोघी बहिणींची नावे आहेत.
आकांक्षा हिने 72 किलो वजनी गटात सुवर्ण पदक (Gold Medal) आणि चांदीची गदा (Silver mace) पटकावत 'भारत ग्रेपलर श्री' हा मान मिळवला, तर धाकटी बहीण कावेरी हिने देखील 62 किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver Medal) मिळवले आहे.
आपल्या देशातील असंख्य क्रीडा प्रेमींकडून या दोघींचेही कौतुक होत आहे. पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंवार मत करत आकांक्षाने सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर कावेरीनेही रौप्यपदक मिळवून उत्कृष्ट कामगिरी गेली आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.