Niti Aayog Health Index: आरोग्य मानांकनात गोव्याची घसरण

NITI आयोगाने राज्यांच्या आरोग्य निर्देशांकाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
Niti Aayog

Niti Aayog

Dainik Gomantak 

Published on
Updated on

NITI आयोगाने राज्यांच्या आरोग्य निर्देशांकाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. आरोग्य क्षेत्रातील कामगिरीच्या मानंकनात केरळने अव्वल स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे मात्र गोव्याच्या क्रमांकामध्ये घसरण झाली आहे. गोवा या कामगिरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. (Niti Aayog Health Index: Goa's decline in health rating)

दरम्यान मागील वर्षी गोव्याचा (Goa) क्रमांक देशात दुसरा होता. आता मात्र गोवा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 2019-2020 या वर्षातील आरोग्य क्षेत्रामधील कामगिरीवर आधारित या मानंकनाची यादी जाहीर केली आहे.

<div class="paragraphs"><p>Niti Aayog</p></div>
मडगाव पालिकेच्या प्रकल्पांवर आचारसंहितेची टांगती तलवार

लहान राज्यांमध्ये, मिझोराम (mizoram) एकूण कामगिरीच्या बाबतीत तसेच वाढत्या कामगिरीच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे. आरोग्य क्षेत्रातील कामगिरीच्या मानंकनात गोव्याने 53.68 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली (delhi) आणि जम्मू आणि काश्मीर एकूण कामगिरीच्या बाबतीत तळाशी होते. परंतु त्यांच्याही कामगिरीमध्ये वाढ झाली आहे. केरळ सलग चौथ्या फेरीत एकूण कामगिरीच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे.

शिवाय, NITI आयोगाने राज्यांच्या आरोग्य निर्देशांकाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. यानुसार, आरोग्य निर्देशांक सुधारण्यात यूपी मोठ्या राज्यांमध्ये अव्वल आहे. सुधारणांच्या बाबतीत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), आसाम आणि तेलंगणा ही 'मोठ्या राज्यां'मध्ये पहिल्या तीन क्रमांकाची राज्ये होती. 'लहान राज्ये' मध्ये, मिझोराम आणि मेघालयने सर्वाधिक वार्षिक प्रगती नोंदवली आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये, जम्मू आणि काश्मीरने सर्वोत्कृष्ट कामगिरी दर्शविली, त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. चौथ्या आरोग्य निर्देशांकानुसार, मोठ्या राज्यांमध्ये केरळ आरोग्याच्या सर्व बाबींवर अव्वल आहे. तर उत्तर प्रदेश तळाशी आहे, परंतु सुधारणेसह मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. या संदर्भात, NITI आयोगाचे सीईओ अमिताभ कांत (Amitabh Kant) म्हणाले की, मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वोत्कृष्ट काम झाले असून इम्प्रूव्ह रँकिंगमध्ये उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर, आसाम क्रमांक 2 आणि तेलंगणा क्रमांक 3 वर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com