'भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही'

मायकल लोबो यांचा भाजपला 'घरचा आहेर'
Michael Lobo

Michael Lobo

Dainik Gomantak 

Published on
Updated on

राज्यात सध्या 'निवडणूकमय' वातावरण आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. यातच भाजप मंत्री मायकल लोबो यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

<div class="paragraphs"><p>Michael Lobo</p></div>
Niti Aayog Health Index: आरोग्य मानांकनात गोव्याची घसरण

भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही. पक्षात कार्यकर्त्यांना किंमत नाही. आम्ही करू ती पूर्व दिशा अशी वृत्ती नेत्यांची बनली आहे, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या निमित्ताने मायकल लोबो (Michael Lobo) गोवा भाजपवर नाराज आहेत का, हा प्रश्न जनतेच्या व भाजप कार्यकर्त्यांच्या मनात उद्भवत आहे.

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीची जंगी तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्ष मतदाराला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कॉँग्रेस आणि भाजप व्यतरिक्त आप आणि तृणमुल कॉँग्रेस देखील मतदारांना सवलतीचे आमिष दाखवत आहेत. याचबरोबर राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाने देखील जोर धरला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बोलताना लोबो म्हणाले होते, " विधानसभा निवडणूक तोंडावर (Goa Assembly Election) आली असल्याने पक्षांतर होणे साहजिकच आहे. रोहन खंवटे, जयेश साळगावकर यांनी केलेले पक्षांतर ही सामान्य प्रक्रिया आहे."

<div class="paragraphs"><p>Michael Lobo</p></div>
'...तर गोव्यात नाईट कर्फ्यू लागू करा'

लोबो यांनी पक्षालाच घरचा आहेर दिल्यामुळे सत्ताधारी पक्षात देखील सर्व काही आलबेल नाही हे मात्र नक्की. लोबो यांची नाराजी पक्ष दूर करतो की हे नाराजी नाट्य वेगळे वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत, हे पक्षासाठी नुकसान दायक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com