Sunil Chhetri: सुनील छेत्री म्हणतोय, '...तेव्हा मेस्सी अन् रोनाल्डोलाही हरवेल'

Sunil Chhetri: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने त्याच्या निवृत्तीबद्दलही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Chhetri
Sunil ChhetriDainik Gomantak

Sunil Chhetri Statement: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री देशातील लोकप्रिय खेळाडूंपैकी आहे. त्याच्या कामगिरीने त्याने आत्तापर्यंत अनेकांना प्रेरणा दिली असून भारतीय फुटबॉल इतिहासातही त्याचे योगदान मोठे राहिले आहे. तो भारतीय फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक गणला जातो. दरम्यान, त्याने म्हटले आहे, देशासाठी तो मोठे आव्हानही पेलू शकतो.

त्याच्या नेतृत्वाखाली नुकतेच भारतीय फुटबॉल संघाने साफ चॅम्पियनशीप (SAFF Championship) स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने कुवेतला निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी झालेली असताना पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशा फरकाने पराभूत केले.

Sunil Chhetri
Sunil Chhetri Record: सुनील छेत्रीने मोडला 'या' स्टार अनुभवी खेळाडूचा रेकॉर्ड, मेस्सीला देणार टक्कर!

या स्पर्धेत सुनील छेत्रीने भारतासाठी 5 गोल करत गोल्डन बुट जिंकला. त्याने यातील तीन गोल पाकिस्तानविरुद्ध केले होते. छेत्रीच्या नावावर आता भारतासाठी 142 सामन्यात 92 गोल नोंदवले गेले आहेत. त्याने देशासाठी 11 विजेतीपदंही मिळवली आहेत.

दरम्यान, न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की देशासाठी तो काहीही करू शकतो.

"जेव्हा देशासाठी सर्वोत्तम देण्याची वेळ येते, तेव्हा मी मेस्सी आणि रोनाल्डोलाही पराभूत करू शकतो."
सुनील छेत्री, भारतीय फुटबॉलपटू

तसेच छेत्री त्याच्या निवृत्तीबद्दल म्हणाला, 'मला आत्ता छान वाटत आहे आणि मला अजूनही देशासाठी खेळण्याची प्रेरणा मिळत आहे. ज्यादिवशी मला असे वाटणार नाही, त्यादिवशी मी थांबेल. पण मला माहित नाही, हे कधी होईल.'

Sunil Chhetri
India Football Team: छेत्रीच्या टीम इंडियाला मिळणार 'एवढ्या' कोटीचे बक्षीस, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

भारताचा यशस्वी फुटबॉलपटू

छेत्री हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आशियातील सर्वाधिक गोल करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फुटबॉलपटू आहे. पहिल्या क्रमांकावर अली दाई असून त्यांनी 109 गोल केले आहेत.

तसेच तो सध्याच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसऱ्या क्रमांकाच फुटबॉलपटू आहे. त्याच्यापुढे केवळ ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी हे खेळाडू आहेत.

पोर्तुगालचा फुटबॉलपटू रोनाल्डोने त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 200 सामन्यांत 132 गोल केले आहेत. तसेच अर्जेंटिनाच्या मेस्सीने 175 सामन्यांमध्ये 103 गोल केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com