Goa Football Association: गोवा फुटबॉल संघटनेने आव्हान पेलले; राज्य पातळीवर 14 लीगचे यशस्वी आयोजन

जीएफएने गतवर्षी 1 नोव्हेंबर रोजी स्पर्धा मोसम सुरू केला. तेव्हापासून सात महिन्यांच्या कालावधीत 826 सामने खेळविण्यात आले आणि स्पर्धाही वेळेत पूर्ण झाल्या.
Goa Football Association
Goa Football AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Football Association: गोवा फुटबॉल संघटनेच्या (GFA) 2022-23 मधील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा मोसमास उशिरा सुरवात झाली, तरीही निर्धारित वेळेत 31 मेपर्यंत 14 राज्यस्तरीय लीग स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान संघटनेने पेलले, अशी माहिती जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जीएफएने गतवर्षी 1 नोव्हेंबर रोजी स्पर्धा मोसम सुरू केला. तेव्हापासून सात महिन्यांच्या कालावधीत 826 सामने खेळविण्यात आले आणि स्पर्धाही वेळेत पूर्ण झाल्या.

जीएफएची गतवर्षी ऑक्टोबरअखेरीस कार्यकारिणी निवडणूक झाली. ‘‘मी सूत्रे स्वीकारली तेव्हा स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान अशक्य ठरेल असे मला वाटले, मात्र तसे झाले नाही. उद्दिष्ट साध्य झाले. लक्ष्यप्राप्तीत साह्य केल्याबद्दल संपूर्ण कार्यकारी समिती, क्लब अधिकारी, स्पर्धा आयोजक यांचा मी आभारी आहे,’’ असे कायतान यांनी सांगितले.

प्रतिदिनी सरासरी चार सामने

संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अँथनी पांगो जीएफए स्पर्धा समितीचे प्रमुख आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमात 826 सामने झाले, प्रतिदिनी चार सामने अशी सरासरी राहिली. मोसमात दोन वेळा एका दिवशी 16 सामने खेळविण्याचा विक्रम जीएफएने नोंदविला. सामन्यांसाठी राज्यभरातील 27 मैदानांचा वापर झाला आणि 7060 खेळाडूंनी भाग घेतला.

‘‘अतिशय कमी कालावधीत स्पर्धा संपविण्यासाठी मैदाने उपलब्ध होणे आवश्यक होते. त्याची पूर्तता एफसी गोवा, सेझा फुटबॉल अकादमी, धेंपो स्पोर्टस क्लब व गोवा सरकारच्या सहकार्यामुळे झाली, त्यामुळे त्यांचा ऋणी आहे,’’ असे पांगो म्हणाले.

Goa Football Association
पोर्तुगिजांनी उद्धवस्त केलेली मंदिरे, पाणी, ट्रॅफिक बाबत प्रश्न; 'हॅलो गोंयकार' कार्यक्रमात CM सावंत यांनी काय दिली उत्तरे?

स्पर्धा आयोजनासाठी 1.30 कोटी रुपये

राज्यस्तरीय 14 लीग स्पर्धा आयोजनासाठी जीएफएला अंदाजे 1.30 कोटी रुपये खर्च करावे लागले. याविषयी जीएफए अध्यक्ष कायतान म्हणाले, की ‘‘मी जेव्हा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा जीएफएची आर्थिक तूट 71 लाख रुपये होती आणि चार वर्षांपासूनची बक्षीस रक्कम रखडली होती. यावेळी स्पर्धा आयोजनासाठी एकूण 1,30,06,000 रुपये खर्च झाले. आम्ही दोन नव्या स्पर्धा घेतल्या. यामध्ये मुलींच्या 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील वयोगटाती स्पर्धेचा समावेश आहे.’’

बक्षीस वितरण सोहळा आज

जीएफएचा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी (ता.03) ताळगाव येथे होईल. यावेळी 2018 ते 2022 या कालावधीत रखडलेली बक्षीस रक्कम वितरीत केली जाईल. शिवाय यावेळच्या मोसमातील बक्षीस वितरण होईल. खेळाडूंना गौरविण्यात येईल, तसेच 16 वैयक्तिक पुरस्कारही दिले जातील. स्पर्धा आयोजकांनाही सन्मानित केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com