FIFA Tribute to Sunil Chhetri: रोनाल्डो, मेस्सीच्या पंक्तीत भारतीय कर्णधार

सुनिल छेत्रीच्या कारकीर्दीवर 'कॅप्टन फँटॅस्टिक' ही तीन भागांची डॉक्युमेंटरी
Sunil Chhetri
Sunil ChhetriDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA Tribute to Sunil Chhetri: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री याला 'फिफा'ने (International Federation Of Football Association) अनोखी मानवंदना दिली आहे. 'फिफा'ने सुनिलवर तीन भागांची डॉक्युमेंटरी बनवली आहे. 'कॅप्टन फँटॅस्टिक' असे या डॉक्युमेंटरीचे नाव आहे.

Sunil Chhetri
Irani Cup 2022: BCCI ने अचानकपणे या खेळाडूवर सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

जगात सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये सुनिल छेत्री (Sunil Chhetri) तिसऱ्या स्थानी आहे. सुनिलने 131 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 84 गोल केले आहेत. या क्रमवारीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Ronaldo) आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (Messi) हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यशाबद्दल कौतूक म्हणून 'फिफा'ने या स्टार फुटबॉलपटूच्या कारकीर्दीवर ही डॉक्युमेंटरी आणली आहे.

'फिफा'ने ट्विटरवर शेअर केलेल्या ग्राफिकमध्ये सुनिल छेत्री हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यासोबत दिसतो. 'फिफा'ने म्हटले आहे की, तुम्हाला रोनाल्डो आणि मेस्सीबाबत सर्वकाही माहिती आहे. आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडुची कहाणी पाहायला मिळणार आहे.

'कॅप्टन फॅन्टॅस्टिक'च्या पहिल्या सीझनमध्ये तीन भाग आहेत. किक ऑफ, मिड गेम आणि एक्स्ट्रा टाईम अशा तीन भागांमध्ये ही डॉक्यु्मेंटरी आहे. यात सुनिल छेत्रीच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याचे चित्रण आहे. सुनील छेत्रीने वयाच्या 20 व्या वर्षी भारतीय फुटबॉल संघात पदार्पण केले होते. या डॉक्युमेंटरीमध्ये विविध मुलाखती, किस्से आहेत. भारतीय फुटबॉलच्या क्षितिजावर सुनील छेत्रीचा उदय, फुटबॉलमध्ये एक नेतृत्व म्हणून झालेला त्याचा विकास असे सर्व काही यात पाहता येईल.

Sunil Chhetri
Hardik Pandya: पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बनला पांड्याचा जबरा फॅन, पाक ची टीम...

कुठे पाहाल?

'फिफा'चा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म 'फिफा प्लस'वर ही डॉक्युमेंटरी पाहता येईल. यावर लाईव्ह सामनेही पाहता येतात. याशिवाय फुटबॉल बाबतचे असंख्य विविध व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. शिवाय वॉच ऑन डीमांड असा पर्यायही तिथे आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप मोफत उपलब्ध आहे.

रोनाल्डिन्होवरही डॉक्युमेंटरी

ब्राझिलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याच्या कारकीर्दीवर 'फिफा'ने नुकतीच आठ भागांची एक डॉक्युमेंटरी स्ट्रीम केली होती. तसेच आणखी एका सीरीजमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल्डन बूट हा किताब पटकाविणाऱ्या विविध खेळाडुंच्या मुलाखती इंग्लंडचे फुटबॉलपटू गॅरी लाईनकर यांनी घेतलेल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com