Shubman Gill: विमानतळावर सुरक्षारक्षक असलेल्या टीममेटच्या वडिलांना गिलचे सरप्राईज

Robin Minz: डिसेंबरमध्ये IPL 2024 च्या लिलावात GT कडून 3.6 कोटी इतकी मोठी किंमत मिळाल्यानंतर रॉबिन इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे.
Shubman Gill And Father Of Robin Minz
Shubman Gill And Father Of Robin MinzInstagram, Shubman Gill

Shubman Gill Meets Robin Minz's Father:

भारताचा क्रिकेटपटू शुभमन गिलने नुकतेच त्याचा गुजरात टायटन्स संघातील सहकारी रॉबिन मिन्झच्या वडिलांची रांची विमानतळावर भेट घेत त्यांना आश्चर्यचकित केले.

रॉबिनचे वडील बिरसा मुंडा विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तेथे शुभमन गिलने रॉबिनच्या वडिलांशी संवाध साधला.

डिसेंबरमध्ये IPL 2024 च्या लिलावात GT कडून 3.6 कोटी इतकी मोठी किंमत मिळाल्यानंतर रॉबिन इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे.

गिलने रॉबिनच्या वडिलांशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी हस्तोलंदन केले आणि फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्यासोबत फोटोही घेतला. सोशल मीडियावर सध्या याची मोठी चर्चा सुरू आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर, गिल त्याच्या कारकिर्दीत या हंगामात प्रथमच आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे.

Shubman Gill And Father Of Robin Minz
James Anderson: 'झहीरला पाहून शिकलो...', अँडरसनचा खुलासा; बुमराहवरही केला कौतुकाचा वर्षाव, वाचा काय म्हणाला

“रॉबिन तुझ्या वडिलांना भेटून मला आनंद झाला. तुझा प्रवास आणि मेहनत प्रेरणादायी आहे. तुला आयपीएलमध्ये पाहण्याची वाट पाहत आहे,” असे शुभमन गिलने रॉबिनच्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करताना त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले.

नुकत्याच झालेल्या जेएससीए स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचा गिल शिल्पकार होता. गिल आणि नवोदित ध्रुव जुरेल यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीमुळे भारताने १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला.

Shubman Gill And Father Of Robin Minz
WPL 2024: किरण नवगिरेची आक्रमक खेळी मुंबईवर भारी; यूपी वॉरियर्सने नोंदवला पहिला विजय; MI च्या मुसक्या आवळल्या

या सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावात गिल 52 धावांवर नाबाद राहिला, तर ज्युरेलने 39* धावा केल्या, ज्यामुळे भारताने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली.

इंग्लंडाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला संघ ठरला.

दोन्ही संघ धर्मशाला येथे ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी पुन्हा आमने-सामने येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com