Women's T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही स्मृती मानधना?

महिला टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak
Published on
Updated on

Smriti Mandhana: दक्षिण आफ्रिकेत महिला टी20 वर्ल्डकप 10 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पहिला सामना 12 फेब्रुवारीला पाकिस्तान महिला संघाविरुद्ध होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाला मोठा बसण्याची शक्यता आहे.

भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना पाकिस्ताविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. सोमवारी (6 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध सराव सामना खेळताना तिच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती.

या दुखापतीतून ती अद्याप सावरली नसल्याचे समजत आहे. या दुखापतीमुळे तिला बुधवारी (8 फेब्रुवारी) झालेल्या बांगलादेश महिला संघाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यातही खेळता आले नव्हते.

Smriti Mandhana
IND vs AUS: वेलकम बॅक जड्डू! पहिल्या कसोटीत 5 विकेट्ससह ऑसींना दणका, पाहा कशी घेतली स्मिथची विकेट; Video

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीच्या सुत्रांनी माहिती दिली आहे की 'तिला सराव सामन्यात दुखापत झाली आहे. आपण अद्याप असे म्हणू शकत नाही की ती वर्ल्डकपमधून बाहेर गेली आहे, पण ती पाकिस्तानविरुद्धचा सामना मुकण्याची शक्यता आहे.'

मानधना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आली होती. पण तीन चेंडू खेळल्यानंतर ती शुन्यावरच बाद झाली होती. दरम्यान, भारताला कर्णधार हरमनप्रीत कौरच्या तंदुरुस्तीचीही चिता असेल. कारण तिलाही या वर्ल्डकपपूर्वी खेळलेल्या तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यात खांद्याची दुखापत झाली होती.

Smriti Mandhana
IND vs AUS: रोहितच मायदेशात 'हिटमॅन'! कसोटीतील 'या' रेकॉर्ड लिस्टमध्ये आता केवळ ब्रॅडमन पुढे

भारतीय संघाचा दुसऱ्या गटात समावेश

यंदाचे महिला टी20 वर्ल्डकपचे हे आठवे पर्व आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार असून त्यांची साखळी फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघाचा दुसऱ्या गटात समावेश आहे.

दुसऱ्या गटात भारतासह इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. तसेच पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारताला साखळी फेरीत पाकिस्ताननंतर वेस्ट इंडिज, इंग्लंड, आणि आर्यंलडविरुद्ध सामने होणार आहेत.

साखळी फेरीनंतर दोन्ही गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये रंगणार आहे.

Smriti Mandhana
IND vs AUS, 1st Test: दुसऱ्या दिवशी रोहित-जडेजाची कमाल, तर ऑसींसाठी 5 विकेट्स घेणारा मर्फी स्टार

टी20 महिला वर्ल्डकप 2023 मधील भारतीय संघाचे वेळापत्रक

12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

15 फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

18 फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

उपांत्य आणि अंतिम फेरी -

23 फेब्रुवारी - पहिला उपांत्य सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

24 फेब्रुवारी - दुसरा उपांत्य सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

26 फेब्रुवारी - अंतिम सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com