Virat Kohli Record against Australia: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारताला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ७ ते ११ जूनदरम्यान कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना द ओव्हल मैदानावर होणार आहे.
या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला खास विक्रम करण्याची संधी आहे. तो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास विक्रम करू शकतो.
या अंतिम सामन्यात जर विराटने 55 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण करेल. तसेच जर त्याने 55 धावा केल्या, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5000 धावा करणारा दुसराच खेळाडूही ठरेल. यापूर्वी असा विक्रम केवळ सचिनने केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 110 सामन्यांमध्ये 49.68 च्या सरासरीने 20 शतकांसह 6707 धावा केल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6000 धावा पार केल्या आहेत. तर अद्याप त्याच्याशिवाय कुणाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5000 धावाही पार करता आलेल्या नाहीत. आता ही संधी विराटकडे आहे.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 92 सामन्यांमध्ये 50.97 च्या सरासरीने 16 शतकांसह 4945 धावा केल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ ब्रायन लारा आहेत. त्यांनी 82 सामन्यांमध्ये 45.76 च्या सरासरीने 12 शतकांसह 4714 धावा केल्या आहेत.
6707 धावा - सचिन तेंडुलकर
4945 धावा - विराट कोहली
4714 धावा - ब्रायन लारा
4495 धावा - देसमंड हाईन्स
4453 धावा - विवियन रिचर्ड्स
विराटने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 4945 धावांपैकी कसोटीमध्ये 24 सामन्यांमध्ये 48.26 च्या सरासरीने 1979 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 8 शतकांचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत 46 सामन्यांमध्ये 52.97 च्या सरासरीने 8 शतकांसह 2172 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 सामन्यांमध्ये 8 अर्धशतकांसह 52.93 च्या सरासरीने 794 धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.