Australia Cricketers on Virat Kohli: विराटबद्दल काय वाटतं? ऑस्ट्रेलियन खेळाडूंना एका शब्दात दिली उत्तरं, स्मिथ म्हणाला...

Video: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विराटबद्दल त्यांच्या मनात येणारा विचार एका शब्दात सांगितला आहे.
Virat Kohli and Steve Smith
Virat Kohli and Steve SmithDainik Gomantak

What the Australian Cricketers think of Virat Kohli?: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघाना 7 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हल स्टेडियमवर होणार आहे.

या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ही तयारी सुरू असतानाच दोन्ही संघांचे सरावाचेच नाही, तर काही मजेशीर व्हिडिओही व्हायरल होत आहेत. नुकताच आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Virat Kohli and Steve Smith
Engalnd Team for Ashes: WTC Final नंतर होणाऱ्या ऍशेसच्या पहिल्या दोन मॅचसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 खेळाडूंना संधी

या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल एक शब्द सांगण्यास सांगितले होते. त्यानुसार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, मार्नस लॅब्युशेन आणि उस्मान ख्वाजा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विराटबद्दल त्यांच्या मनात येणारा विचार एका शब्द/वाक्यात मांडला आहे.

ग्रीनने 'मॅन ऑफ इंडिया' असे म्हटले, तर डेव्हिड वॉर्नरने 'अविश्वसनीय कव्हर ड्राईव्ह' असे उत्तर दिले. त्याचबरोबर लॅब्युशेनने सर्व प्रकारातील दिग्गज असे म्हणत विराटचे कौतुक केले.

तसेच मिचेल स्टार्कने 'कुशल, वर्चस्व राखणारा, मधल्या फळीचा कणा' असे उत्तर दिले, तर पॅट कमिन्सने उत्तर दिले की 'लढण्यास देण्यास सैदव तयार असणारा.' उस्मान ख्वाजाने त्याला 'स्पर्धात्मक' म्हटले. याशिवाय स्मिथने विराटला 'सुपरस्टार' असे संबोधले.

Virat Kohli and Steve Smith
Test Championship Format: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल! पण WTC स्पर्धा खेळवली जाते तरी कशी?

दरम्यान, विराटवर या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने यावर्षात चांगली कामगिरी केली आहे. तसेच विराट यंदाच्या वर्षात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल 2023 स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दमदार कामगिरी केली.

त्याने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 53.25 च्या सरासरीने 639 धावा केल्या आहेत. तसेच त्याने या हंगामात दोन सलग शतकेही ठोकली.

दरम्यान, विराटने यावर्षी वनडे आणि कसोटीतही शतके केली आहेत. त्यामुळे त्याच्याकडून हाच फॉर्म कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही कायम राहण्याची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com