Asian Games: ऐतिहासिक! 107 पदकांसह संपली भारताची मोहिम, जाणून घ्या कोणत्या खेळात मिळाले मेडल्स

India At Asian Games: भारताने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी 107 पदके जिंकली.
Asian Games
Asian GamesDainik Gomantak
Published on
Updated on

India Won 107 Medals at 19th Asian Games Hangzhou, China:

चीनमध्ये जवळपास गेले 15 दिवस 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेचा रविवारी (8 ऑक्टोबर) अखेरचा दिवस आहे. असे असले, तरी भारताची या स्पर्धेतील मोहीम शनिवारी (7 ऑक्टोबर) संपली. भारतासाठी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली.

भारताने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 100 हून अधिक पदके जिंकली आहेत. भारताने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 107 पदके जिंकली आहेत. यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारत पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला. ही पदके मिळवताना अनेक विक्रमही रचले गेले आणि अनेक खेळाडूंना पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळाली.

Asian Games
Asian Games Cricket: पावसाची आडकाठी, पण ऋतुराजच्या टीम इंडियाचा गोल्डवर कब्जा! अफगाणिस्तानला रौप्य

पदक तालिकेत यजमान चीन 382 पदकांसह अव्वल क्रमांकवर राहिला. त्यांनी 200 सुवर्ण 111 रौप्य आणि 71 कांस्य पदके जिंकली. दुसऱ्या क्रमांकावरील जपानने 51 सुवर्ण, 66 रौप्य आणि 69 कांस्य अशी मिळून 186 पदके जिंकली. तिसऱ्या क्रमांकावर कोरिया आहे. त्यांनी 42 सुवर्ण, 59 रौप्य आणि 89 कांस्य अशी मिळून 190 पदके जिंकली.

भारताची पदके

भारताने सर्वाधिक पदके ऍथलेटिक्समध्ये मिळाली आहेत. भारताने ऍथलेटिक्समधील विविध प्रकारात मिळून भारताने 29 पदके जिंकली आहेत. यामध्ये 6 सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्यापोठापाठ भारताने नेमबाजीत 22 पदके जिंकली, ज्यात 7 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

Asian Games
Asian Games: शेवटच्या क्षणी राडा, सामनाही थांबला, पण भारतानं कबड्डीत दुसरं गोल्ड जिंकलंच!

तसेच भारताने तिरंदाजीमध्ये एकूण 9 पदके जिंकली, ज्यात 5 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यानंतर कुस्तीमध्ये भारताने 1 रौप्य आणि 5 कांस्य अशी 6 पदके जिंकली. बॉक्सिंग, रोइंग आणि स्क्वॅशमध्ये भारताने प्रत्येकी 5 पदकांची जिंकली.

बॅडमिंटनमध्येही भारताला 3 पदके मिळाली. तसेच सेलिंगमध्येही भारताने 3 पदके जिंकली. त्याचबरोबर रेगू-सेपक टेकराव, वूशू, ब्रिज, कॅनोए, गोल्फ आणि टेबल टेनिस या खेळांमध्ये भारताला प्रत्येकी 1 पदक मिळाले.

त्याचबरोबर बुद्धिबळ, घोडेस्वारी, रोलर स्केटिंग आणि टेनिस या खेळांमध्ये प्रत्येकी 2 पदके मिळाली. याशिवाय क्रिकेट, हॉकी आणि कबड्डी या सांघिक खेळांमध्येही भारताच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांना मिळून प्रत्येकी 2 पदके मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com