Asian Games: शेवटच्या क्षणी राडा, सामनाही थांबला, पण भारतानं कबड्डीत दुसरं गोल्ड जिंकलंच!

Indian Kabaddi Team: आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या अंतिम सामन्यात अखेरच्या क्षणी बराच वाद झाल्यानंतर भारताने सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.
India Kabaddi Team
India Kabaddi TeamDainik Gomantak
Published on
Updated on

India Kabaddi Men's Team Won Gold Medal at 19th Asian Games Hangzhou :

चीनमध्ये सुरु असेलल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) पुरुषांच्या कबड्डीमध्ये भारत विरुद्ध इराण यांच्या रोमांचक अंतिम सामना झाला.

या सामन्यात 33-29 अशा फरकाने भारताने विजय मिळवला आणि सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. भारतीय पुरुष कबड्डी संघाचे हे आठवे सुवर्ण पदक आहे.

दरम्यान अंतिम सामन्यात अखेरचा एक मिनिट राहिला असताना मोठा वाद झाला होता. दोन्ही संघ 28-28 अशा बरोबरीत असताना भारताचा कर्णधार पवन सेहरावतने केलेल्या रेडमुळे हा वाद झाला.

India Kabaddi Team
Asian Games: भारतीय हॉकी संघाला सुवर्ण यश! जपानला पराभूत करत चौथ्यांदा जिंकलं 'गोल्ड मेडल'

त्याने रेड केली, तेव्हा तो इराणच्या खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करत असतानाच लॉबीमध्ये गेला, त्याला डॅश करण्याच्या प्रयत्नात इराणचे काही खेळाडूही लॉबीमध्ये गेले. यावेळी पवनने टच पाँइंट मिळवला की तो कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करताच लॉबीमध्ये गेला, यावरून वाद झाला.

कोणत्या संघाला किती गुण मिळाले, यावरून बराच गोंधळ झाला, जवळपास तीनवेळा गुणांचा निकाल सामनाधिकाऱ्यांकडून बदलण्यात आला. पण दोन्ही संघही आपापल्या मतांवर ठाम असल्याने अखेर काही वेळासाठी सामना सस्पेंड करण्यात आला होता.

पण अखेर बऱ्याच वादानंतर आणि जवळपास 1 तास सामना थांबवल्यानंतर पवनच्या त्या रेडवर भारताला ३ गुण आणि इराणला 1 गुण देण्यात आला. त्यामुळे भारताचे चार वर्षांपासूनचे सुवर्ण पदकाची प्रतिक्षा संपली. इराणला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

तथापि, कबड्डीच्या नियमानुसार जर रेडर प्रतिस्पर्धी संघातील कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता लॉबीमध्ये गेला, तर तो बाद होतो, पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही लॉबीत आले, तर ते देखील बाद होतात. हा नियम या सामन्यात महत्त्वाचा ठरला.

India Kabaddi Team
Asian Games मध्ये चीनची मनमानी? नीरज-ज्योतीसह भारतीय खेळाडूंविरुद्ध झाला अन्याय

दुसरे पदक

दरम्यान, कबड्डीत हे यंदाचे भारताचे दुसरे सुवर्ण पदक आहे. याआधी शनिवारीच भारताच्या महिला कबड्डी संघानेही सुवर्ण यश मिळवले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चायनीत तिपैईविरुद्ध 26-25 असा रोमांचक विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

भारतीय महिला कबड्डी संघाचे हे एशियाडमधील तिसरे सुवर्णपदक ठरले. त्यांनी 2010 आणि 2014 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com