Indian Men's Cricket Team won Gold Medal at 19th Asian Games Hangzhou:
चीनमध्ये सुरु असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
शनिवारी पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. पण हा सामना सुरु असताना पावसाचा अडथळा आला. त्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे सामना रद्द झाला.
मात्र, या स्पर्धेत भारताचे मानांकन अफगाणिस्तानपेक्षा अधिक असल्याने भारताला सुवर्णपदक मिळाले, तर अफगाणिस्तानला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
या सामन्यात पावसाचा अडथळा येण्यापूर्वी अफगाणिस्तान प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. त्यांनी 18.2 षटकात 5 बाद 112 धावा केल्या होत्या. पण त्यांची फलंदाजी सुरु असतानाच होंगझाऊ येथे पावसाला सुरुवात झाल्याने सामना रद्द झाला.
या सामन्यात अफगाणिस्तानने सुरुवातीच्या 3 विकेट्स अवघ्या 12 धावांवर गमावल्या होत्या. मात्र, शहिदुल्लाह कमालने आधी अफसर झझाईला साथीला घेत डाव सावरलाय. मात्र, झझाई देखील 15 धावांवर बाद झाला.
त्यापाठोपाठ करिम जनत 1 धावेवर बाद झाला. पण यानंतर कर्णधार गुलबदीन नाईम आणि कमाल यांनी अर्धशतकी भागीदारी करत अफगाणिस्तानला शंभरी पार करून दिली होती. मात्र नंतर पावसामुळे सामना रद्द झाला.
भारताकडून अर्शदीप सिंग, शिवम दुबे, शाहबाज अहमत आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
दरम्यान, पुरुष क्रिकेटमध्ये बांगलादेशने शनिवारी पाकिस्तानला पराभूत करत कांस्य पदक जिंकले आहे.
क्रिकेटमधील भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे एकूण दुसरे पदक आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच भारताच्या महिला क्रिकेट संघानेही सुवर्ण पदक जिंकले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.