BAN vs IND: टीम इंडियासाठीचं पदार्पण ठरलं ऐतिहासिक! 'या' खेळाडूच्या नावावर मैदानात पाऊल ठेवताच मोठा रेकॉर्ड

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताकडून दोन क्रिकेटपटूंचे पदार्पण झाले आहे.
Minnu Mani
Minnu ManiDainik Gomantak
Published on
Updated on

Anusha Bareddy and Minnu Mani Debut for India Women Cricket Team: भारतीय महिला संघ याच वर्षी सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मैदानात उतरला. भारतीय महिला संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून 3 सामन्यांची टी20 मालिका रविवारी सुरु झाली आहे.

टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाकडून मिन्नू मणी आणि अनुषा बारेड्डी यांनी पदार्पण केले आहे. भारतीय महिला संघाकडून टी20 पदार्पण करणाऱ्या त्या 74 आणि 75 व्या खेळाडू ठरल्या.

Minnu Mani
Champions Trophy 2013: धोनीचा 'तो' सल्ला अन् टीम इंडिया बनली चॅम्पियन, वाचा त्या अविस्मरणीय विजयाची कहाणी

मिन्नू मणीने रचला इतिहास

दरम्यान, या सामन्यातून पदार्पण झाल्याने अष्टपैलू मिन्नू मणीने मोठा इतिहासही रचला आहे. ती भारतीय महिला संघाकडून क्रिकेट खेळणारी केरळ राज्याची पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.

विशेष म्हणजे तिने पदार्पणातच भारताकडून पहिली विकेटही मिळवली. तिने बांगलादेशच्या शमिमा सुलताना हिला 17 धावांवर पाचव्या षटकात बाद केले. तिच्या गोलंदाजीवर सुलतानाचा झेल जेमिमा रोड्रिग्सने घेतला.

मिन्नू मणी खेळली दिल्ली कॅपिटल्सकडून

मिन्नू मणी पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळली आहे. तिला दिल्लीने 30 लाख रुपयांना खरेदी केले होते. ती फलंदाजी करण्याबरोबरच फिरकी गोलंदाजी करते. तिने मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन आणि गुजरात जायंट्स विरुद्ध एक सामना या हंगामात खेळला.

Minnu Mani
BCCI Chief Selector: शिक्कामोर्तब झालं! अजित आगरकर भारतीय संघाचा नवा 'चीफ सिलेक्टर'

मिन्नू मणी ही केरळमधील वयानंदमधील छोयीमुला येथील असून तिचे वडील मणी सीके हे मजूर आहेत. तसेच आई वसंता या गृहिणी आहेत. मिन्नूने क्रिकेट खेळण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. तिने तिच्या कामगिरीच्या जोरावर केरळ महिला संघात जागा मिळवली, तसेच ती भारतीय महिला अ संघाकडूनही खेळली. आता तिने भारतीय संघात स्थान मिळवत इतिहास रचला.

असे आहेत दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

  • बांगलादेश महिला संघ - निगार सुलताना (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमा खातून, शमीमा सुलताना, नाहिदा अक्‍तर, रितू मोनी, शोर्ना अक्‍तर, मारुफा अक्‍तर, शोभना मोस्‍तरी, शाथी राणी, सुलताना खातून, राबेया खान.

  • भारतीय महिला संघ - भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, अनुषा बरेड्डी, मिन्नू मणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com