VIDEO: कोहलीचा आक्रमक अवतार अन् गौतम गंभीरचे ते एक्सप्रेशन; कॅमेऱ्यात कैद झाला तो क्षण, सोशल मीडियावर मीम्सचा पूर!

Gautam Gambhir Trolled On Social Media: कोहलीच्या या तडाखेबंद इनिंगनंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच गोष्टीची जोरदार चर्चा रंगली. विराटच्या या शतकानंतर सोशल मीडियावर गौतम गंभीरला जोरदार ट्रोल केले जात आहे.
Gautam Gambhir Trolled On Social Media
Gautam Gambhir Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Gautam Gambhir Trolled On Social Media: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे अत्यंत शानदार आणि आक्रमक खेळ खेळत चाहत्यांची मने जिंकली. टीम इंडियाच्या डावातील सुरुवातीच्या वीस षटकांनंतर वेस्टइंडिजचा संघ सामन्यात कुठल्याही टप्प्यावर टिकताना किंवा लढताना दिसला नाही. या संपूर्ण सामन्यात भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत महत्त्वपूर्ण विकेट्स काढल्या, तर फलंदाजीत कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानात धावांसाठी तुफान फटकेबाजी केली. या दमदार कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने 8 षटके बाकी असतानाच 8 गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.

या ऐतिहासिक विजयात किंग कोहलीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत 88 चेंडूंमध्ये नाबाद 139 धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याच्या या खेळीने पुन्हा एकदा चाहत्यांना त्याच्या जुन्या आणि सर्वोत्तम फॉर्मची आठवण करुन दिली. मात्र, या विजयानंतर आणि कोहलीच्या या तडाखेबंद इनिंगनंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली. विराटच्या या शतकानंतर सोशल मीडियावर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) ट्रोल केले जात आहे.

Gautam Gambhir Trolled On Social Media
Gautam Gambhir: '..मला चुकायचे अधिकार आहेत'! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीवरती गंभीरने सोडले मौन; क्रिकेटविश्वात खळबळ

विराटने आपल्या या शानदार खेळीदरम्यान 10 चौके आणि 9 गगनचुंबी षटकार ठोकत तब्बल 157.95 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. परंतु, त्याच्या या विक्रमी खेळीनंतर सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराटच्या आठव्या षटकारानंतर ड्रेसिंग रुममधील इतर सर्व प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आनंद साजरा करताना दिसत आहेत, मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कुठलाही उत्साह किंवा आनंद व्यक्त करताना दिसत नाही.

Gautam Gambhir Trolled On Social Media
Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

काही चाहत्यांनी असा आरोप केला की, गंभीर विराटच्या या मोठ्या खेळीवर फारसा खूश नाही. जरी सामना संपल्यानंतर गंभीरने विजयानंतर विराट कोहलीला मिठी मारुन त्याचे अभिनंदन केले असले, तरी सोशल मीडियावर तो जुनाच गंभीरचा निरुत्साही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com