Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Gautam Gambhir test coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी गौतम गंभीरच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
 Gautam Gambhir
Gautam Gambhir Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी गौतम गंभीरच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गंभीर यांची कसोटी प्रशिक्षक म्हणून बदली होणार असल्याच्या वृत्तांना त्यांनी साफ नकार देत, या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले.

विशेष मुलाखतीत सैकिया यांनी सांगितले की, लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी प्रशिक्षक बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि गौतम गंभीर आपल्या करारानुसारच भूमिका पार पाडत राहतील.

गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आयसीसी आणि एसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये ही सातत्यपूर्ण कामगिरी दिसून आलेली नाही. विशेषतः सेने (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांविरुद्ध भारताला १० पराभवांना सामोरे जावे लागले असून, त्यामुळे संघाच्या कसोटी रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 Gautam Gambhir
Gautam Gambhir: मोठी बातमी! 'गौतम गंभीर'चे प्रशिक्षकपद जाणार? या खेळाडूला झाली विचारणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

गेल्या महिन्यात भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ही चर्चा आणखी तीव्र झाली. या पराभवानंतर बीसीसीआयने कसोटी संघासाठी पर्यायी प्रशिक्षकांचा विचार सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विशेषतः बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे क्रिकेट संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे नाव संभाव्य पर्याय म्हणून चर्चेत आले होते.

 Gautam Gambhir
IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

मात्र, सैकिया यांनी या सर्व दाव्यांना स्पष्ट शब्दांत फेटाळले. कोणत्याही प्रशिक्षकाशी संपर्क साधलेला नाही, तसेच गंभीर यांच्या जागी बदल करण्याबाबत मंडळाच्या पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी हेही अधोरेखित केले की, गौतम गंभीर यांचा करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत असून, सध्याची प्रशिक्षक व्यवस्था कायम राहणार आहे. त्यामुळे गंभीर यांच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना बीसीसीआयने अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com