India vs Pakistan: भारत- पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट, चाहत्यांच्या आनंदात विरजण पडणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज

T20 world cup 2026: टी२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान येत्या रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Pakistan Weather Report

टी२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान येत्या रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. कोलंबोमधील लहरी हवामानामुळे या हाय-व्होल्टेज सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मैदानाबाहेर पाकिस्तानच्या बहिष्कार आणि नंतर माघारीच्या नाट्यानंतर आता निसर्ग या सामन्यात काय भूमिका बजावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोलंबोमध्ये पावसाचा जोर

फेब्रुवारी महिना हा श्रीलंकेत सहसा कोरडा असतो, मात्र यंदा कोलंबोमध्ये पावसाने अनपेक्षित हजेरी लावली आहे. यापूर्वीचे अनेक सराव सामने पावसामुळे रद्द करावे लागले होते. ताज्या अंदाजानुसार, रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची ५० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे.

विशेषतः सामन्याच्या सुरुवातीच्या वेळी म्हणजेच स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे सामन्याचा नाणेफेक आणि सुरुवात होण्यास विलंब होऊ शकतो.

India vs Pakistan
Leopard In Goa: डिचोलीत बिबट्याची दहशत, भर लोकवस्तीत वावर; विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांच्या जीवाला धोका

चाहत्यांची धाकधूक वाढली

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक आहेत. मात्र, हवामान खात्याच्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला ६५ टक्के पावसाची शक्यता आहे, ज्याचा परिणाम मैदानावर होऊ शकतो. जरी रात्रीच्या वेळी ढग विरळ होतील असे वाटत असले, तरी रात्री ८ च्या सुमारास हलक्या पावसाचा अंदाज कायम आहे. अशा परिस्थितीत ४० षटकांचा पूर्ण खेळ होण्याऐवजी षटकांची कपात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

India vs Pakistan
Goa Assembly Session: 'विधानसभा अधिवेशन कालावधी वाढवा'! विरोधकांची मागणी; सभापतींना पत्र देण्याचा घेतला निर्णय

आयोजकांसमोर आव्हान

आर. प्रेमदासा स्टेडियमने आतापर्यंत या स्पर्धेत काही सामन्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. भारत-पाक सामन्यापूर्वी येथे ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातही लढत होणार आहे. पावसाने खेळ थांबवल्यास आउटफिल्ड खराब होऊ नये म्हणून मैदानाचे कर्मचारी सज्ज आहेत. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाल्यास गुण विभागले जातील, जे दोन्ही संघांसाठी, विशेषतः पाकिस्तानसाठी नुकसानकारक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com