India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

ODI World Cup 2027 India vs Pakistan: आगामी एकदिवसीय विश्वचषक 2027 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेच्या नव्या फॉरमॅटची घोषणा केली आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी एकदिवसीय विश्वचषक 2027 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेच्या नव्या फॉरमॅटची घोषणा केली आहे. या नव्या रचनेमुळे स्पर्धा अधिक रोमांचक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी एकूण 14 संघ विश्वचषकात सहभागी होणार असले तरी मुख्य स्पर्धेच्या सुरुवातीलाच दोन संघांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात केवळ 12 संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.

सुरुवातीला पात्रता फेरी, त्यानंतर गटपद्धतीने सामने

नव्या फॉरमॅटनुसार सुरुवातीला तळाच्या क्रमांकावरील संघांमध्ये पात्रता स्वरूपाचे सामने खेळवले जातील. या फेरीनंतर पात्र ठरलेले संघ मुख्य स्पर्धेत प्रवेश करतील. त्यानंतर उर्वरित 12 संघांचे प्रत्येकी सहा संघांचे दोन गट केले जातील. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर पाच संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. या फेरीतील कामगिरीच्या आधारे पुढील फेरीसाठी संघांची निवड होईल.

India vs Pakistan
Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

'सुपर-7' फेरी ठरणार निर्णायक

गट टप्प्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आणि उर्वरित संघांमधील सर्वोत्तम कामगिरी करणारा आणखी एक संघ अशा एकूण सात संघांना सुपर-7 फेरीत प्रवेश मिळेल. या फेरीत प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध सामना खेळेल. या टप्प्यानंतर गुणतालिकेतील अव्वल संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

भारत-पाकिस्तानमध्ये अनेक सामन्यांची शक्यता

या नव्या फॉरमॅटमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकापेक्षा अधिक सामने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही संघ एकाच गटात आल्यास गट फेरीत त्यांची पहिली लढत होऊ शकते. त्यानंतर दोन्ही संघांनी सुपर-7 फेरीत स्थान मिळवले, तर पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची संधी असेल. एवढेच नव्हे, दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठल्यास तिसऱ्यांदाही महामुकाबला रंगू शकतो.

India vs Pakistan
Goa Cyber Crime: कष्टाची कमाई ऑनलाईन चोरांच्या घशात! पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने नुवेच्या महिलेला 4.47 लाखांचा गंडा; सायबर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

चाहत्यांसाठी क्रिकेटची मेजवानी, पण अट एकच

भारत-पाकिस्तान सामन्यांना नेहमीच जागतिक स्तरावर मोठे महत्त्व असते. त्यामुळे नव्या फॉरमॅटनंतर क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, दोन किंवा तीन सामने होण्यासाठी दोन्ही संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रत्येक फेरी यशस्वीपणे पार करणे आवश्यक असेल. दोन्ही संघांनी अपेक्षेप्रमाणे खेळ केल्यास 2027 चा विश्वचषक भारत-पाक महामुकाबल्यांची खास मेजवानी ठरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com