Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

India Wins By 124 Runs in Asian Games: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एशियन गेम्स 2026च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.
India Wins By 124 Runs in Asian Games
India Wins By 124 Runs in Asian GamesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India Wins By 124 Runs in Asian Games: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एशियन गेम्स 2026च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा 124 धावांनी दारुण पराभव करुन फायनलचे तिकीट कन्फर्म केले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 9.5 षटकांत अवघ्या 45 धावांवर पत्त्यासारखा कोसळला. आता सुवर्णपदकासाठी भारत फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध लढणार आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या 12 धावांवर पहिला धक्का बसला. अभिषेक शर्मा 3 चेंडूंमध्ये 7 धावा करुन बाद झाला, तर संजू सॅमसनही 9 चेंडूंमध्ये 7 धावा करुन माघारी परतला. अशा कठीण प्रसंगी वैभव सूर्यवंशीने एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत 21 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावांची वेगवान खेळी खेळली. कर्णधार श्रेयस अय्यर 13 चेंडूंत 13 धावा करुन बाद झाला.

India Wins By 124 Runs in Asian Games
Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

त्यानंतर पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या ईशान किशनने मैदानात तुफान फटकेबाजी केली. ईशानने 46 चेंडूंमध्ये नाबाद 80 धावांची विस्फोटक खेळी खेळली, ज्यामध्ये 4 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार लगावले. त्याच्या या धमाकेदार खेळीमुळेच भारताला निर्धारित 20 षटकांत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 169 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून सहान अराचिगे आणि थारिंडु रत्नायके यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

India Wins By 124 Runs in Asian Games
Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये चीनचा धुव्वा उडवत टीम इंडियानं रचला इतिहास; अटीतटीच्या सामन्यात मारली बाजी

प्रत्युत्तरात 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या डावाची अत्यंत खराब सुरुवात झाली. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच दोन फलंदाज बाद झाले आणि अवघ्या 2 धावसंख्येवर श्रीलंकेचे 3 बडे फलंदाज तंबूत परतले. सिनेथ जयवर्धना, लसिथ क्रूसपुल आणि सोहन डी लिवेरा यांना खातेही उघडता आले नाही. विकेट्स पडण्याचे सत्र इथेच थांबले नाही. डावात 18 धावा होतात तोपर्यंत श्रीलंकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी अत्यंत घातक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि संघाला सहज व ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com