अंडर-19 वर्ल्ड कप फायनल, आयुष म्हात्रेच्या 'यंग ब्रिगेड'समोर इंग्लंडचं आव्हान; कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना?

U-19 World Cup 2026 Final: क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ, भारत आणि इंग्लंड आज अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
U-19 World Cup 2026 Final
U-19 World Cup 2026 FinalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

U19 World Cup Final Date Time : क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ, भारत आणि इंग्लंड आज अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लबवर हा हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेत अजिंक्य राहत अंतिम फेरीत धडक मारली असून, कोट्यवधी भारतीयांच्या नजरा या 'यंग ब्रिगेड'वर खिळल्या आहेत. भारत आज सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा खिताबी सामना भारतीय समयानुसार दुपारी १ वाजता सुरू होईल. त्याआधी दुपारी १२:३० वाजता नाणेफेक (टॉस) होईल. भारतीय संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला होता, तर इंग्लंडने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाची फलंदाजी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांसारख्या खेळाडूंमुळे मजबूत दिसत आहे.

U-19 World Cup 2026 Final
Goa Crime: मोठी कारवाई! म्हापशात 65 लाखांचे ड्रग्स, कुडचडेत 9 लाखांचा गांजा जप्त; मजुरांचे बिहार कनेक्शन उघड

भारतीय संघाने आतापर्यंत २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये विश्वचषक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यंदा भारत १० व्यांदा अंतिम सामना खेळत आहे. दुसरीकडे, इंग्लंडला १९९८ नंतर एकदाही हा किताब जिंकता आलेला नाही. त्यामुळे इंग्लिश संघ त्यांचा २८ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र, भारताचा सध्याचा फॉर्म पाहता इंग्लंडसाठी हे आव्हान सोपे नसेल.

U-19 World Cup 2026 Final
Tirumala Tirupati Goa: ‘तिरुमला’चे संचालक अखेर झुकले! ऑडिटसाठी कागदपत्रे सादर करण्‍याची दिली हमी; NOC रद्दमुळे दणका

थेट प्रक्षेपण आणि संभाव्य संघ

हा रोमांचक सामना भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. तसेच, मोबाईलवर जियोहॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रवाह (Live Streaming) उपलब्ध असेल.

भारतीय संभाव्य संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Team India Bilateral Series Before World Cup 2027
India Wins Gold Medal in Asian Games Women Cricket 2026
India Women Cricket Team
India Women Cricket Team Enters Asian Games Final
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com