U19 Asia Cup 2026 Final: "आता लाज वाटायला हवी", अंडर-19 आशिया कप फायनलमधील पराभवानंतर संतापला माजी पाकिस्तानी खेळाडू

Tanveer Ahmed Reacts To Pakistan U19 Defeat: पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमदने एका लाईव्ह शो दरम्यान व्हिडिओ पोस्ट करत पाकिस्तानच्या या दारुण पराभवावर तीव्र संताप व्यक्त केला.
Tanveer Ahmed Reacts To Pakistan U19 Defeat
Tanveer Ahmed Reacts To Pakistan U19 DefeatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Tanveer Ahmed Reacts To Pakistan U19 Defeat: ओमानमधील अल अमरात क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी (14 नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया कप 2026च्या फायनल सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा पराभव केला, ज्याची चर्चा आगामी अनेक वर्षे क्रिकेट विश्वात रंगत राहील. या अटीतटीच्या लढतीत भारतासमोर विजयासाठी 338 रनचे महाविशाल लक्ष्य होते. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज असताना 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहित उल्वाने चौकार ठोकत भारताला एका विकेटने रोमांचक विजय मिळवून दिला.

या अकल्पनीय विजयानंतर जिथे एकीकडे भारतीय युवा खेळाडूंच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे, तिथे दुसरीकडे पाकिस्तानमध्ये त्यांच्या माजी क्रिकेटपटूंकडून पराभवाचे खापर थेट स्वतःच्या क्रिकेट बोर्डवर फोडले जात आहे. पाकिस्तानचा (Pakistan) माजी खेळाडू तन्वीर अहमदने व्हिडिओ पोस्ट करत पाकिस्तानच्या या दारुण पराभवावर तीव्र संताप व्यक्त केला असून, आता भारताशी तुलना करणे बंद करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्टपणे कबूल केले.

Tanveer Ahmed Reacts To Pakistan U19 Defeat
Asia Cup Cricket: पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात गोव्याचा व्यंकट ठरला किमयागार; अखेरच्या क्षणी संधी मिळाली, नाबाद 11 धावा आणि 3 बळींची कमाल

तन्वीर अहमदने संताप अनावर करताना म्हटले की, पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली असून आपण आता हे मानले पाहिजे की भारत आणि आपल्या क्रिकेट प्रणालीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात जो नवीन अध्यक्ष येतो, तो केवळ स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना पुढे ढकलण्याचे काम करतो, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट स्ट्रक्चर उद्ध्वस्त झाले. आपल्या बोर्डाने सर्वकाही मातीत मिळवले असून आपण क्रिकेटच्या पातळीवर पूर्णपणे 'झिरो' आहोत.

Tanveer Ahmed Reacts To Pakistan U19 Defeat
Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

यासोबतच त्याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शेवटच्या क्षणी ज्या दबावाखाली मोहित उल्वाने चमत्कारिक खेळी खेळली, त्याचे कौतुक करताना तन्वीर म्हणाला की, मोहितने आपल्या नाबाद 49 रनच्या जिगरबाज खेळीत 5 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला आणि आता जेव्हा तो भारतात परतेल, तेव्हा तो तिथला खरा हिरो ठरलेला असेल, हे निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.