Indian Hockey Player Varun Kumar: बलात्काराचा आरोप असणाऱ्या वरुणची 'या' लीगमधून माघार; टीम इंडियाला मोठा धक्का

Indian Hockey Team: भारतीय हॉकी संघाचा स्टार खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेता वरुण कुमार सध्या मोठ्या अडचणीचा सामना करत आहे.
Indian Hockey Player Varun Kumar
Indian Hockey Player Varun KumarDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Hockey Player Varun Kumar:

भारतीय हॉकी संघाचा स्टार खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेता वरुण कुमार सध्या मोठ्या अडचणीचा सामना करत आहे. वरुण कुमारवर अलीकडेच पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा आरोप करण्यात आला होता, जो त्याने खोटा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणादरम्यान वरुण कुमारने आता एफआयएच प्रो लीगमधून आपले नाव मागे घेतले आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी त्याने ही माघार घेतली असल्याचे सांगितले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, हॉकी इंडियाने 28 वर्षीय वरुणला तात्काळ सुट्टी दिली आहे कारण या घटनेमुळे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्याने म्हटले होते. अल्पवयीन असताना वरुणने तिचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला, त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी (Police) हॉकीपटू वरुणविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Indian Hockey Player Varun Kumar
टीम इंडियाच्या खेळाडूवर बलात्काराचा आरोप, भारतासाठी जिंकली आहेत अनेक विजेतेपदे

सोमवारी दाखल केलेल्या तक्रारीत 22 वर्षीय महिलेने म्हटले की, ती 2018 मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वरुणच्या संपर्कात आली आणि ती 17 वर्षांची असताना वरुणने लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांना पत्र लिहून त्यांनी दावा केला की, त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी असून हा राज्य सरकारच्या यंत्रणेचा दुरुपयोग आहे.

Indian Hockey Player Varun Kumar
IPL 2023 दरम्यान टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर यशस्वी शस्त्रक्रिया, WTC फायनलमधून...

वरुणने लिहिले की, मीडिया रिपोर्ट्सवरुन मला कळले की मी पूर्वी ज्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो तिने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणी बंगळुरुमध्ये (Bangalore) एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने कारवाई केली नाही. या संदर्भात माझ्याशी अद्याप संपर्क साधण्यात आला नाही.

तो पुढे म्हणाला की, हे प्रकरण माझ्याकडून पैसे उकळण्याचा आणि माझी प्रतिष्ठा आणि प्रतिमा डागाळण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे, कारण मी एक प्रतिष्ठित हॉकी खेळाडू असून भारतासाठी खेळतो आणि अर्जुन पुरस्कार विजेता आहे. तिला माहित आहे की, अशा केसमुळे माझे करियर आणि प्रतिमा खराब होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com