Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिला इटलीवर दणदणीत विजयासह सेमीफायनलमध्ये! पॅरिस ऑलिम्पिकच्या आशाही जिवंत

India Women vs Italy Women Hockey: रांचीत चालू असलेल्या हॉकी ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेत भारतीय महिला संघाने मंगळवारी इटलीविरुद्ध दणक्यात विजय मिळवला.
India Women Hockey Team
India Women Hockey TeamX/FIH_Hockey
Published on
Updated on

Indian women hockey team secure 5-0 win against Italy 5-0 to enter semi-finals of Olympic Qualifiers Ranchi 2024:

रांचीमध्ये एफआयएच हॉकी ऑलिम्पिक क्वालिफायर 2024 स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत भारतीय महिला संघ खेळत आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा अखेरचा साखळी फेरीतील सामना इटली महिला संघाविरुद्ध मंगळवारी (16 जानेवारी) झाला.

मंगळवारी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इटलीला 5-1 अशा फरकाने पराभूत केले. यासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह भारतीय महिलांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत.

आता भारतीय महिला संघाचा उपांत्य फेरीतील सामना जर्मनीविरुद्ध होईल. दरम्यान, उपांत्य फेरीत विजय मिळवणारे संघ यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार आहेत, तर पराभूत होणारे संघ तिसऱ्या क्रमांकासाठी आमने-सामने येतील. तिसरा क्रमांक मिळवणारा संघही पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल.

India Women Hockey Team
Hockey Olympic Qualifiers: मिशन पॅरिस ऑलिम्पिक! भारतीय महिला संघ रांचीत खेळणार क्विलिफायर, पाहा वेळापत्रक

दरम्यान, भारतीय महिला संघाने या क्वालिफायर स्पर्धेत पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभव स्विकारला होता. मात्र नंतर दमदार पुनरागमन करत दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले आणि आता तिसऱ्या सामन्यात इटलीला पराभूत केले.

या सामन्यात भारताकडून उदीता (1', 55'), दिपीका (41'), टेटे सलीमा (45') आणि नवनीत कौर (53') यांनी गोल केले. तसेच इटलीकडून कॅमिला मशीन (60') हिने एकमेव गोल केला.

भारताकडून 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या उदीताने सुरुवात शानदार करून दिली होती. तिने सामन्याच्या पहिल्याच मिनिटात भारतासाठी पहिला गोल नोंदवला. यानंतर मात्र, पहिल्या क्वार्टरमध्ये कोणालाही गोल करता आला नाही.

India Women Hockey Team
Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिलांचे अमेरिकेविरुद्ध पराभवानंतर जबरदस्त कमबॅक, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला चारली धूळ

दुसऱ्या क्वार्टमध्येही दोन्ही संघांनी एकमेकांचे गोलचे प्रयत्न फोल ठरवले. त्यामुळे हाफ टाईमपर्यंत भारताकडे 1-0 अशी आघाडी होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ही आघाडी दिपीका आणि सलीमा यांनी आणखी भक्कम केली दिपीकाने 41 व्या मिनीटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर भारतासाठी दुसरा गोल नोंदवला.

तसेच तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरील सलीमाने तिसरा गोल नोंदवला. अखेरच्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाचे आक्रमण चांगले राहिले. नवनीतने 53 व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवत भारताची आघाडी 4-0 अशी वाढवली होती. त्याच्यानंतर दोनच मिनिटात उदिताने पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक दुसरा, तर भारतासाठी पाचवा गोल नोंदवला.

मात्र सामन्याच्या अगदी अखेरच्या मिनिटात कॅमिला मशीन हिने पेनल्टी कॉर्नरवर अचूक निशाणा साधत इटलीला पहिला गोल नोंदवून दिला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे भारताने हा सामना 5-1 अशा फरकाने सहज जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com