Rohit Sharma: हिटमॅनचा स्वॅग! चॉपरमधून इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी उतरला धरमशालेत, पाहा Video

Rohit Sharma arrived in Chopper: रोहित शर्मा धरमशाला येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी चॉपरमधून पोहचला.
Rohit Sharma
Rohit SharmaX
Published on
Updated on

Rohit Sharma arrived in Dharamsala in Chopper ahead of 5th Test against England

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. 7 मार्चपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्या धरमशालेत पोहचले आहेत आणि सरावालाही सुरुवात केली आहे.

दरम्यान, मंगळवारी (5 मार्च) भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे चॉपरमधून पोहचला. तो चॉपरमधून उतरतानाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

Rohit Sharma
IND vs ENG 5th Test: धरमशालामध्ये भारताला मोठी संधी; टीम इंडिया करणार 112 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी?

या कसोटीपूर्वी रोहित त्याची पत्नी राधिकासह जामनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी उपस्थित होता. त्यानंतर आता तो पुन्हा भारतीय संघात सामील झाला आहे.

दरम्यान, पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक भक्क करण्याची संधी असणार आहे.

या मालिकेत सध्या भारतीय संघ 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. या आघाडीसह भारताने मालिकाही खिशात घातली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. तर नंतरचे दुसरा, तिसरा आणि चौथा सामना भारताने जिंकला.

Rohit Sharma
IND vs ENG: इंग्लिश खेळाडूंची हिमाचलच्या दरी-खोऱ्यांतून सैर, तर वाहत्या थंडगार पाण्यातही मारली डुबकी, Video व्हायरल

पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएल 2023 पूर्वी होणारा भारताचा हा अखेरचा कसोटी सामना आहे.

पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडीक्कल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com