IND vs ENG Dharamshala: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 3-1 ने आघाडीवर आहे. पहिल्या 4 पैकी 3 कसोटी जिंकून टीम इंडियाने इंग्लंडचा चांगलाच समाचार घेतला.
आता टीम इंडियाची नजर धरमशाला कसोटीत विजयाकडे आहे. टीम इंडिया 2017 नंतर येथे कसोटी सामना खेळणार आहे. गेल्या वेळी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर येथे एकही कसोटी खेळली गेली नाही. आता क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट येथे परतत असल्याने चाहत्यांना टीम इंडियाचा विजय पाहायचा आहे.
दरम्यान, या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. त्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद शमीसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय संघाला पुनरागमन करणे कठीण जाईल, असे बोलले जात होते. अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण रोहित शर्माची टीम इंडिया मागे हटली नाही. पुढचे तीन सामने जिंकून टीम इंडियाने आपली प्रतिभा सिद्ध करुन दाखवली. भारताने मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली असून आता संघ 4-1 अशा फरकाने मालिका संपवण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडियाने धरमशाला येथील पाचवा कसोटी सामना जिंकल्यास एका विशेष विक्रमाची बरोबरी होईल. आतापर्यंत, कसोटी इतिहासात असे केवळ 3 वेळा घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर 4-1 अशा फरकाने मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे.
इंग्लंडने 112 वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती. योगायोगाने आता भारत त्याच्याविरुद्ध हा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडने 1912 मध्ये ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने दोनदा अशी कामगिरी केली आहे. 1897/98 आणि 1901/02 मध्ये 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर त्यांनी मालिका 4-1 ने जिंकली.
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने 28 धावांनी जिंकली. त्यानंतर भारताने पुनरागमन केले. टीम इंडियाने विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकली. राजकोटमधील तिसरी कसोटी त्याने 434 धावांनी जिंकली.
रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने पाच गडी राखून विजय मिळवला. भारताने घरच्या मैदानावर सलग 17 वी मालिका जिंकली आहे. 22 फेब्रुवारी 2013 पासून भारताने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.