U19 World Cup: मुशीर खानचं खणखणीत शतक, तर कर्णधाराचीही फिफ्टी! भारताचे आयर्लंडला 302 धावांचे आव्हान

India U19 vs Ireland U19: 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाकडून आयर्लंडविरुद्ध मुशीर खानने शानदार शतक ठोकले, तसेच कर्णधार उदय सहारननेही अर्धशतकी खेळी केली.
Musheer Khan
Musheer Khan X/BCCI
Published on
Updated on

U19 World Cup 2024, India U19 vs Ireland U19:

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत गुरुवारी भारत आणि आयर्लंड यांच्या 19 वर्षांखालील संघांत सामना होत आहे. ब्लोएमफाँटेनला होत असलेल्या या सामन्यात भारताने आयर्लंडसमोर 302 धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 301 धावा केल्या. भारताकडून मुशीर खानने शानदार शतक केले, तसेच कर्णधार उदय सहारनने अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताकडून आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी यांनी सलामीला फलंदाजी केली. मात्र चांगली सुरुवात मिळाल्यानंतर हे दोघेही त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. आदर्श 17 धावांवर बाद झाला, तर आर्शिनने 32 धावा केल्या.

Musheer Khan
U19 World Cup : विश्वविजयासाठी यंगिस्तान भिडणार! स्पर्धेचं स्वरुप, भारताचे सामने अन् वेळ, जाणून घ्या सर्वकाही

मात्र, त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीर खानला कर्णधार उदयची शानदार साथ मिळाली. या दोघांनी आयर्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. या दोघांनी मिळून दीडशतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताने 200 धावांचा टप्पा सहज ओलांडला होता.

अखेर त्यांची जोडी 45 व्या षटकात फिन लटनने घेतली. त्याने उदयला डॅनिएल फोर्किनच्या हातून झेलबाद केले. उदयने 84 चेंडूत 75 धावांची खेळी केली. उदय आणि मुशीर यांच्यात 156 धावांची भागीदारी झाली.

Musheer Khan
U19 World Cup: 92 धावांचं लक्ष्य, नॉन-स्ट्रायकर रनआऊट अन् न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध 1 विकेटने नाट्यमय विजय

उदयनंतर 48 व्या षटकात भारताला दोन धक्के बसले. मुशीर खान धावबाद झाला, तर अरावेल्ली रावला ऑलिव्हर रिलीने बाद केले. मुशीरने 106 चेंडूत 118 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच अरावेल्लीने 22 धावांची खेळी केली.

अखेरीस सचिन धसने आक्रमक खेळ केला. त्याने 9 चेंडूत आक्रमक 21 धावा ठोकल्या आणि भारताला 300 धावांचा टप्पा पार करून दिला.

आयर्लंडकडून ऑलिव्हर रिलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जॉन मॅकनेलीने 2 विकेट्स घेतल्या, तर फिन लटनने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com