U19 World Cup : विश्वविजयासाठी यंगिस्तान भिडणार! स्पर्धेचं स्वरुप, भारताचे सामने अन् वेळ, जाणून घ्या सर्वकाही

U19 Cricket World Cup 2024: 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
U19 World Cup Captains
U19 World Cup CaptainsX/cricketworldcup

ICC U19 Cricket World Cup 2024:

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 19 वर्षांखालील मुलांची वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेला दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पॉचेफस्ट्रूमला, तर आयर्लंड विरुद्ध युएसए यांच्यात ब्लोएमफाँटेनला सामना होणार आहे.

ही स्पर्धा 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणार आहे. 11 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून या 16 संघात मिळून 41 सामने खेळवण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघाचा समावेळ अ गटात आहे. या गटात बंगालादेश, आयर्लंड आणि युएसए या संघांचाही समावेश आहे.

त्याचबरोबर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ; क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे चार संघ; तर ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ हे चार संघ सामील आहेत.

U19 World Cup Captains
Arshin Kulkarni: समोर कॅलिसला पाहाताच अर्शिनने केला वाकून नमस्कार; भारताचा U19 स्टार म्हणाला, 'आयुष्यातील बेस्ट दिवस'

भारतीय संघाचे सामने

भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता असून सर्वाधिकवेळा विजेतेपदही भारतानेच जिंकले आहे. भारताच्या युवा संघाने 5 वेळा 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे यंदा भारतीय संघ सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरणार आहे.

भारताचा 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 मधील पहिला सामना 20 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 25 जानेवारीला आयर्लंडविरुद्ध, 28 जानेवारीला अमेरिकेविरुद्ध भारतीय संघ सामने खेळणार आहे.

भारताचे हे तिन्ही सामने ब्लोएमफाँटेनला खेळवले जाणार आहेत. हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1.30 वाजता चालू होणार आहेत. दरम्यान, भारतीय संघ अ गटात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिला, तर पुढच्या फेरीत प्रवेश करेल.

U19 World Cup Captains
IND-U19 vs SA-U19: फायनलमध्ये पावसाचा अडथळा! भारत-द. आफ्रिका युवा संघ तिरंगी मालिकेचे संयुक्त विजेते

स्पर्धेचे स्वरुप

साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरी खेळतील. सुपर सिक्समध्ये अ आणि ड गटातील तीन-तीन संघांचा एक गट केला जाईल आणि ब आणि क गटातील तीन-तीन संघांचा एकत्र दुसरा गट केला जाईल.

दरम्यान, सुपर सिक्स फेरीत प्रत्येक संघ आपल्या साखळी फेरीच्या गटातील संघाशी सामना खेळणार नाही. त्यांच्यात साखळी फेरीतीलच निकाल सुपर सिक्ससाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. याशिवाय दुसऱ्या गटातील त्याच क्रमांकाच्या संघाशीही सामना खेळणार नाही.

उदाहरणार्थ साखळी फेरीतील अ गटातील अव्वल क्रमांकाचा संघ अ गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांशी खेळणार नाही. त्यांच्याविरुद्ध साखळी फेरीत आधीच सामना खेळलेला असल्याने त्याच सामन्यांचा निकाल सुपर सिक्समध्ये कायम केला जाईल.

तसेच अ गटातील अव्वल संघ ड गटात अव्वल राहणाऱ्या संघाशीही सामना खेळणार नाही. त्यामुळे ड गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांची अ गटातील अव्वल क्रमांकावर राहणाऱ्या संघाचा सामना होईल.

दरम्यान, सुपर सिक्समधील अव्वल चार संघ उपांत्य फेरी खेळतील, तर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामना खेळतील.

साखळी फेरी 19 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान होईल, त्यानंतर 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान सुपर सिक्स फेरी होईल. उपांत्य फेरीतील सामने 6 आणि 8 फेब्रुवारीला होईल. दरम्यान, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने बेनोनीला होणार आहेत.

U19 World Cup Captains
Rahul Dravid Son: U19 क्रिकेट गाजवत असलेल्या लेकाला द्रविड का देत नाही कोचिंग, स्वत:च केला खुलासा

लाईव्ह स्ट्रिमिंग

19 वर्षांखालील विश्वचषकातील सामने भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर दिसणार आहेत. तसेच डिज्नी + हॉटस्टार या ऍप आणि वेबसाईटवरही सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

19 वर्षांखालील वर्ल्डकपसाठी भारतीय संघ -

आर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयुर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अविनाश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इन्नेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गावडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com