Pranali Kodre
चीनमध्ये झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष हॉकी संघांनी पदकांची कमाई केली आहे.
त्याचमुळे हॉकी इंडियाने दोन्ही संघांसाठी रोख बक्षीसाची घोषणा केली आहे.
भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात जपानला 5-1 अशा गोल फरकाने पराभूत करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील एकूण 16 वे, तर चौथे सुवर्ण पदक आहे.
या सोनेरी यशाबद्दल हॉकी इंडियाने भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 5 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना 2.50 लाख रुपये बक्षीस घोषित केले आहे.
तसेच भारतीय महिला हॉकी संघाने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात 2-1 अशा फरकाने जपानला पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले.
भारतीय महिला हॉकी संघाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सातवे पदक आहे.
कांस्य पदक जिंकल्याबद्दल हॉकी इंडियाने भारतीय महिला हॉकी संघातीव खेळाडूंना प्रत्येकी 3 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना दीड लाख रुपये बक्षीस घोषित केले आहे.