सिराजचा BCCI कडे खळबळजनक खुलासा, टीमच्या 'इनसाईड' माहितीसाठी झालेला संपर्क...

मोहम्मद सिराजने त्याच्या टीमच्या 'इनसाईड' माहितीसाठी संपर्क साधण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Mohammed Siraj
Mohammed SirajDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammed Siraj reports corrupt approach to BCCI ACU: भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराजने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती दिली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार सिराजने बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला माहिती दिली आहे की ऑस्ट्रेलिया संघ यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी त्याला अज्ञात व्यक्तीने संघातील आतील माहितीसाठी संपर्क साधला होता.

तसेच अशी माहिती मिळाली आहे त्या जुगारी व्यक्तीने भारताच्या सामन्यांवेळी भरपूर पैसे हरले होते. त्यामुळे त्याने वैतागून सिराजला मेसेज केला होता.

ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी भारताने यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळल्या होत्या. भारताने श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेत 2-1 आणि वनडे मालिकेत 3-0 असा विजय मिळवला होता. तसेच न्यूझीलंडविरुद्ध भारताने वनडे मालिकेत 3-0 आणि टी20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता.

Mohammed Siraj
विराटकडून CSK विरुद्ध मॅचमध्ये काय चूक झाली की BCCI ने केली मोठी कारवाई

पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका सुत्राने याबाबत माहिती दिली आहे की 'ज्या व्यक्तीने सिराजला संपर्क केला होता, तो व्यक्ती बुकी नव्हता. तो हैदराबादमधील एक ड्रायव्हर होता. ज्याला भारताच्या सामन्यांवर सट्टेबाजी करण्याची सवय आहे. भारताच्या अनेक सामन्यांदरम्यान बरेच पैसे हरल्यानंतर त्याने सिराजला व्हॉट्सऍपवरून संपर्क साधला होता.'

'सिराजने लगेचच याबद्दल तक्राक केली. त्यानंतर आंध्र पोलीसांनी लगेचच त्या व्यक्तीला पकडले होते.'

साल 2013 मध्ये समोर आलेल्या सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयने नियम अधिक कडक केले असून त्यांच्या भष्ट्राचार विरोधी पथकाचे नेटवर्कही वाढवले आहे. 2013 मध्ये एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडेला यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर बंदीसारख्या कडक कारवाईला सामोरे जावे लागले होते.

तसेच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांना त्यांच्या फ्रँचायझी प्रमुख सदस्यांपैकी काही सदस्य सट्टेबाजी प्रकरणात दोषी सापडल्याने दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते.

Mohammed Siraj
Mohammed Siraj: आनंदाश्रू! सिराजचे कुटुंबीय मॅचचा थरार पाहण्यासाठी थेट मैदानात, आईने...

आता प्रत्येक आयपीएल संघाबरोबर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचा एक अधिकारी असतो. हा अधिकारी संघाबरोबरच त्यांच्या हॉटेलमध्येच राहातो. तसेच मैदानावरीलही सर्व हालचालींवरही लक्ष ठेवतो.

याशिवाय भ्रष्टाचार विरोधी पथकाचे वर्कशॉप पूर्ण करणेही सर्व खेळाडूंना अनिवार्य आहे. यामध्ये खेळाडूंना काय करावे आणि काय नाही, याबद्दल माहिती दिली जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर अशा प्रकारच्या भष्टाचारासंबधित माहिती खेळाडूंनी दिली नाही, तर खेळाडूंवर कारवाई केली जाऊ शकते.

यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर 2021 मध्ये अशी कारवाई झाली होती.

दरम्यान, सिराज सध्या आयपीएल 2022 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत आहे. बेंगलोरने या स्पर्धेत आत्तापर्यंत 5 सामन्यांमधील 2 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 3 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com