विराटकडून CSK विरुद्ध मॅचमध्ये काय चूक झाली की BCCI ने केली मोठी कारवाई

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्यानंतर विराट कोहलीवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Fined 10 Per Cent Of Match Fee: सोमवारी (17 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने 8 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात विराटवरील कारवाईची माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या आचार संहितेतील नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली विराटवर सामनाशुल्काच्या 10 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

Virat Kohli
Video Viral: हाय व्होल्टेज सामन्यानंतर विराट-धोनीच्या फॅन्सला सुखावणारी पाहा 'माहीराट' मोमेंट

तसेच बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात असेही सांगण्यात आले आहे की 'विराट कोहलीने आयपीएल आचार संहितेतील कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक मान्य केली आहे.' दरम्यान, विराटकडून नक्की काय चूक झाली याबद्दल माहिती देण्यात आलेली नसली, तरी त्याच्यावर कलम 2.2 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कलम 2.2 सर्वसाधारण क्रिकेट कृतीच्या व्यतिरिक्त कोणतीही अयोग्य कृती करणे, जसे की खेळपट्टीवर मारणे किंवा लाथ मारणे, किंवा कोणतीही कृती जाणीवपूर्वक करणे, ज्यामुळे कोणत्याही क्रिकेट उपकरणांचा, साधनसामग्रीचे नुकसान करणे, याबद्दल आहे.

Virat Kohli
IPL 2023: हार्दिकची RR विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी, 'हा' विक्रम करणारा जडेजानंतरचा दुसराच ऑलराऊंडर

सीएसकेचा संघ फलंदाजी करत असताना शिवम दुबे 17 व्या षटकात वेन पार्नेलच्या गोलंदाजीवर 52 धावांवर बाद झाल्यानंतर विराटने आक्रमक सेलिब्रेशन केले होते. त्यावेळी मोहम्मद सिराजने दुबेचा सीमारेषेजवळ झेल घेतलेला. याच विकेटनंतर विराटने केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे त्याच्यावर ही कारवाई झाली असल्याचा कयास बांधला जात आहे.

यापूर्वी अशाप्रकारच्या कारवाईला याच हंगामात हृतिक शोकिन आणि नितीश राणा यांनाही सामोरे जावे लागले होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या सामन्यात हृतिकने केकेआरचा कर्णधार नितीशला बाद केल्यानंतर त्याला डिवचले होते. त्यानंतर नितीशनेही पलटून त्याला उत्तर दिले होते. त्यादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता.

त्यामुळे मुंबईचा गोलंदाज हृतिकवर सामनाशुल्काच्या १० टक्के आणि नितीशवर 25 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com