World Cup 2023: दिल्लीचे तख्त राखण्यासाठी अफगाणिस्तानचे भारतासमोर 273 धावांचे लक्ष्य; बुमराहच्या 4 विकेट्स

India vs Afghanistan: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दिल्लीत होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 273 धावांचे ठेवले आहे.
Team India
Team India
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Afghanistan:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 273 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 272 धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या.

Team India
World Cup 2023: 'बर्थ डे बॉय' हार्दिकची बॉलिंग अन् शार्दुल ठाकूरचा बाउंड्रीवर भन्नाट कॅच, पाहा Video

या सामन्यात अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी डावाची चांगली सुरुवात केलेली. पण सहाव्या षटकात इब्राहिमला जसप्रीत बुरराहने बाद केले. त्यानंतर 13 व्या षटकात बर्थ डे बॉय हार्दिक पंड्याने गुरबाजला माघारी धाडले. त्याचा 21 धावांवर शार्दुल ठाकूरने बाउंड्री लाईनवर शानदार झेल घेतला.

त्याच्यापुढेच्याच षटकात शार्दुल ठाकूरन् रेहमत शाहला 16 धावांवर बाद करत अफगाणिस्तानला तिसरा धक्का दिला. त्यामुळे अफगाणिस्तानची अवस्था 3 बाद 63 धावा अशी झाली होती.

मात्र, त्यानंतर कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह उमरझाई या दोघांनी मिळून अफगाणिस्तानचा डाव सावरला. त्यांनी हा डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारीही केली. तसेच वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले.

Team India
IND vs AFG: अफगाणिस्तानला हरवणं सोपं नाही, 2019 च्या विश्वचषकातील 'हा' ब्लॉकबस्टर सामना तुम्ही विसरलात का?

मात्र, त्यांची भागीदारी तोडण्यात हार्दिक पंड्याला यश मिळाले. त्याने 35 व्या षटकात उमरझाईला त्रिफळाचीत केले. उमरझाईने 69 चेंडूत 62 धावांची खेळी केली. पण त्यानंतर शाहिदीला अनुभवी मोगम्मद नबी साथ देण्यासाठी आला. मात्र, त्यांची जोडी फारवेळ कुलदीप यादवने टिकू दिली नाही.

त्याने शाहिदीला पायचीत केले. शाहिदीने 88 चेंडूत 80 धावंची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारले. त्यानंतर नजिबुल्लाह झाद्रान आणि नबी 45 व्या षटकात बुमराहच्या विरुद्ध खेळताना बाद झाले.

मात्र, त्यानंतर राशीद खानने आक्रमक पवित्रा घेतला होता. पण त्याचा अडथळा बुमराहने दूर केला. राशीद 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. अखेरीस मुजीब उर रेहमान 10 धावांवर आणि नवीन-उल-हक 9 धावांवर नाबाद राहिले.

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्याने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com