Asian Games: 'पदक जिंकताच...', नंदिनीचे स्वप्ना बर्मनने केलेल्या ट्रान्सजेंडरच्या आरोपावर प्रत्युत्तर

Nandini Agasara: आशियाई क्रीडा स्पर्धेत मेडल जिंकलेल्या नंदिनी अगसाराने स्वप्ना बर्मनच्या ट्रान्सजेंडर असल्याच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे.
Swapna Barman  | Nandini Agasara
Swapna Barman | Nandini AgasaraInstagram
Published on
Updated on

Nandini Agasara react on Swapna Barman's transgender allegations:

चीनमध्ये सध्या 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताच्या अनेक खेळाडूंनी शानदार खेळी करत प्रभावी कामगिरी केली आहे. पण यादरम्यान सोमवारी (2 ऑक्टोबर) सकाळीच भारताच्या हेप्टाथलॉन महिला खेळडू स्वप्ना बर्मन आणि नंदिनी अगसारा यांच्यातील एक मोठा वाद समोर आला होता.

या स्पर्धेत महिलांच्या 800 मीटर हेप्टाथलॉन स्पर्धेत भारताच्या नंदिनी अगसाराने कांस्य पदक जिंकले. पण त्यानंतर याच स्पर्धेच चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या भारताच्याच स्वप्ना बर्मन हिने केलेली वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट चर्चेत राहिली.

तिने कोणाचेही नाव न घेता तिच्या पोस्टमध्ये दावा केला होता की तिची एका ट्रान्सजेंडर महिला खेळाडूमुळे कांस्य पदक जिंकण्याची संधी हुकली. पण नंतर तिने ही पोस्ट डिलीट केली.

Swapna Barman  | Nandini Agasara
Asian Games 2023: ऑटो चालकाच्या मुलीचा चीनमध्ये पराक्रम, ॲन्सी सोजनने लांब उडीत जिंकले रौप्यपदक

दरम्यान, तिने इंस्टाग्राम लाईव्हवर देखील नंदिनीवर आरोप करताना म्हटले की तिने घाबरून क्रीडाग्राम सोडले आहे. तसेच तिने असेही म्हटले की 'खेळात हार-जीत होत राहाते, पण नंदिनी ट्रान्सजेंडर आहे. आमच्यासाठी एक महिन्याचे ट्रेनिंग हे ट्रान्सजेंडरसाठी एका दिवसाचा सराव असतो, कारण त्यांच्या शरिरात टेस्टारोनचे प्रमाण अधिक असते.'

यानंतर इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीवेळी नंदिनीने तिच्यावर झालेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे.

तिने सांगितले की 'मला माहित आहे की मी कोण आहे. तिला पुरावा दाखवायला सांगा. मी सुद्धा दाखवेल की मी भारतासाठी पदक जिंकले आहे. मला फक्त माझ्या देशासाठी चांगली कामगिरी करायची होती.'

'आता आम्ही जिंकलो आहोत, तर लोकांनी त्याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. मी याबद्दल ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडे तक्रार करणार आहे. मला पदक जिंकल्याबद्दल आनंद साजरा करायचा होता, पण माझी आई आजारी असल्याने मी भारतात लगेच जात आहे.'

Swapna Barman  | Nandini Agasara
Asian Games 2023: जयस्वालच्या धमाक्यानंतर गोलंदाजांनीही दाखवली चमक! टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये

तसेच टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नंदिनीने असेही म्हटले आहे याआधीच तिने याबद्दल आरोप का केले नाहीत? तिने म्हटले की 'जेव्हा मी माझ्या जिद्दीने आणि मेहनतीने कांस्य पदक जिंकले त्यानंतर तिने ट्रान्सजेंडर सारख्या बाबींबद्दल चर्चा सुरू केली. हे अयोग्य आहे. मी सरकारचे आणि फेडरेशनचे आभार मानते की ते माझ्या पाठीशी उभे राहिले.'

नंदिनीने 5712 पाँइंट्स मिळवत कांस्य पदक जिंकले. तसेच स्वप्नाने 5708 पाँइंट्स मिळवले. तिचे कांस्य पदक अवघ्या 4 पाँइंट्सने हुकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com