Shubman Gill: आजारपणात ICC ने गिलला दिली गुडन्यूज, मिळाला 'हा' मोठा पुरस्कार

ICC Award: शुभमन गिलला आयसीसीने मोठा पुरस्कार जाहीर केला आहे.
Shubman Gill
Shubman Gill
Published on
Updated on

India's Batter Shubman Gill won ICC Men's Player of the Month for September 2023:

भारताचा स्टार युवा क्रिकेटपटू शुभमन गिल सध्या डेंग्युमधून सावरत आहे. अशातच त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीने नुकताच ऑक्टोबर महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराच्या विजेत्या खेळाडूंची घोषणा केली आहे.

यामध्ये ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार भारताच्या शुभमन गिलला मिळाला आहे. या पुरस्कारासाठी पुरुष गटातून गिलसह मोहम्मद सिराज आणि डेविड मलान यांना नामांकन मिळाले होते. पण गिलने या दोघांनाही मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे.

गिलने सप्टेंबर महिन्यात आशिया चषक स्पर्धा खेळली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली. त्याने सप्टेंबर महिन्यात 8 वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने 80 च्या सरासरीने 2 शतके आणि 3 अर्धशतकांसह 480 धावा केल्या.

गिल आशिया चषकात सर्वाधिक 302 धावा करणारा खेळाडू होता. त्याने 75.5 च्या सरासरीने या धावा केल्या होत्या. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही दोन डावात 178 धावा केल्या होत्या.

त्याने आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध शतक केले, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शतक ठोकले. त्याच्या याच कामगिरीमुळे तो वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरही आला.

Shubman Gill
IND vs PAK सामन्यापूर्वी रंगणार संगीत मैफील! कुठे अन् किती वाजता सुरू होणार सोहळा?

वर्ल्डकपमध्ये पदार्पणाची प्रतिक्षा

गिल सध्या दमदार फॉर्ममध्ये असला तरी सध्या सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. हा त्याचा कारकिर्दीतील पहिलाच वनडे वर्ल्डकप आहे. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्याच्या तोंडावरच त्याला डेंग्यु झाल्याचे निदान झाले.

त्यामुळे त्याला भारताकडून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळता आला नाही. आता तो सावरत असून शनिवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही, यावर मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, त्याचा फॉर्म पाहाता त्याने लवकरात लवकर भारतीय संघात पुनरागमन करावे, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

24 वर्षीय गिलने वनडे कारकिर्दीमध्ये 35 सामन्यांमध्ये 66.1 च्या सरासरीने 1917 धावा केल्या आहेत.

Shubman Gill
Shubman Gill: 'कॅन्सर असताना वर्ल्डकप खेळलेलो...', युवराजला IND vs PAK सामन्यात गिल खेळण्याची आशा

चामरी अटापट्टूनेही जिंकला पुरस्कार

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार श्रीलंकेच्या चामरी अटापट्टूने जिंकला. तिने हा पुरस्कार जिंकला दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वॉलवार्ट आणि नादीन दे क्लर्क यांना मागे टाकले.

तिने सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेचे नेतृत्व करताना इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक टी20 मालिका जिंकली. महिला क्रिकेटमध्ये हा श्रीलंकेचा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही क्रिकेट प्रकारातील पहिला मालिका विजय होता. या मालिकेत तिने 114 धावा केल्या आणि 5 विकेट्सही घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com