IND vs PAK Test Series: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे (IND vs PAK) अनेक वर्षांपासून कोणतीही क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही. गेल्या 15 वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये एकही कसोटी सामना खेळला गेला नाही.
आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये हे दोन्ही संघ अनेकदा एकमेकांशी भिडतात. मात्र, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तटस्थपणे कसोटी मालिका खेळवण्यास सहमती दर्शवली आहे.
आता कसोटी मालिकेच्या मुद्द्यावर बीसीसीआयकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष नजम सेठी यांनी काही दिवसांपूर्वी भारताविरुद्धची कसोटी मालिका तटस्थ ठिकाणी खेळवण्याची कल्पना मांडली होती.
पण, एएनआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने या मुद्द्यावर सांगितले की, 'आमच्याकडे कधीही किंवा आगामी काळात अशी कोणतीही योजना नाही. कारण आम्ही पाकिस्तानसोबत (Pakistan) कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार नाही.'
अलीकडेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी म्हणाले होते की, 'मला वाटते की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत द्विपक्षीय कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात.'
सेठी यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डला बोलताना सांगितले की, 'ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा अगदी दक्षिण आफ्रिकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका खेळवावी.'
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. 2012 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात शेवटची मालिका खेळली गेली होती.
पाकिस्तानने भारताचा (India) दौरा केला आणि त्यानंतर दोन्ही संघांमध्ये समान संख्येच्या तीन T20 आणि ODI मालिका खेळल्या गेल्या. त्यानंतर, हे दोन्ही देश कधीच आमनेसामने आले नाहीत. जरी दोन्ही देश जवळजवळ प्रत्येक आयसीसी स्पर्धेत एकमेकांसमोर असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.