IND vs ENG: सलग दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी केली निराशा, 600 हून अधिक धावा करुनही...

IND vs ENG, Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि पाहुण्या संघाला 399 धावांचे लक्ष्य दिले.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs ENG, Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि पाहुण्या संघाला 399 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून शुभमन गिलने 104 तर अक्षर पटेलने 45 धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम हार्टलीने 77 धावांत चार तर रेहान अहमदने 88 धावांत तीन बळी घेतले. जेम्स अँडरसनने 29 धावांत दोन बळी घेतले. मात्र, दुसऱ्या कसोटीतही विकेट्समधील मोठी भागीदारी ही भारतासाठी चिंतेची बाब होती. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला एकदाही 100 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करता आलेली नाही.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 253 धावांवर गारद झाला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने मजबूत धावा केल्या आहेत, मात्र फलंदाज शतकी भागीदारी करण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे दुसऱ्यांदा भारतीय संघाच्या नावावर नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Rohit Sharma
IND vs ENG: द्विशतकानंतर सेलिब्रेशनवेळी फ्लाइंग किस का दिले? जयस्वालनेच सांगितलं कारण

दुसरीकडे, पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकूण 638 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात संघाने एकूण 651 धावा केल्या आणि एकही शतकी भागीदारी झाली नाही. दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात 95 धावांची सर्वात मोठी भागीदारी झाली. भारताने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत शतकी भागीदारी न करता सर्वाधिक धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने एकूण 724 धावा केल्या होत्या. 1990 मध्ये लॉर्ड्सवर 678 धावा केल्या होत्या.

Rohit Sharma
IND vs ENG: गिलच्या शतकानंतरही टीम इंडिया 255 धावांत सर्वबाद, इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य

शतकी भागीदारीशिवाय भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा

724 विरुद्ध WI मुंबई WS 2011

678 विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स 1990

663 विरुद्ध पाक बंगळुरु 2005

656 विरुद्ध बांगलादेश चितगाव 2010

651 विरुद्ध इंग्लंड विझाग 2024

638 विरुद्ध इंग्लंड हैदराबाद 2024

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com