क्रिडा संकुल दुरऊपयोग प्रकरणी प्राधिकरणाने न्यायालयाकडे मागितली तीन आठवड्यांची मुदत

बायणातील एम पी टी मैदानावर एमपीटीतर्फे क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी निवासी क्रीडा अकादमी (Sports Academy) बांधण्यात आली होती.
Sports Complex
Sports ComplexDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या (Morgaon Port Trust) क्रीडासंकुलाचा विमानतळ प्राधिकरणाने सीआयएसएफ निवास म्हणून वापर करून दुरुपयोग केल्याने नजीर खान (Nazir Khan) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठात (Goa Bench) दिलेल्या आव्हानाला प्राधिकरणाला उत्तर दाखल करण्यासाठी प्राधिकरणाने आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली आहे.

बायणातील एम पी टी मैदानावर एमपीटीतर्फे क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी निवासी क्रीडा अकादमी बांधण्यात आली होती. परंतु कालांतराने ती अकादमी बंद पडताच त्या इमारतीचा वापर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या निवासासाठी करण्यात येऊ लागला आहे. येथे स्वयंपाक करण्यात येतो. उरलेले उष्टे, अन्न, इतर वस्तू कचरा कुंपणापलीकडे टाकण्यात येतो. तर तेथील कुंपणापलिकडून लोकांची ये-जा चालू असते. त्यांना या कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागते.

Sports Complex
Goa Sports: राज्यातील बॉक्सिंगला ‘धेंपो’चे पाठबळ

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान जवळपासच्या विद्यालयांमध्ये स्वच्छतेसंबंधी धडे देण्यास जातात परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडून विरोधाभासाची कृती घडते. दरम्यान येथील एमपीटी मैदानावरील इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल युनिटीतर्फे कुंपणाबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यासंबंधी पालिकेचे मुख्याधिकारी यांना ३ ऑक्टोबर २०१९ रोजी निवेदन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देण्याऐवजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या युनिट कडून कचरा करण्यात येतो ही लज्जास्पद गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान बायणा येथील एम पी टी मैदानावरील स्पोर्ट्स अकादमी कॉम्प्लेक्सची इमारत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला भाडेपट्टीवर दिल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते नजीर खान यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला वेळ देण्यात आली होती. सदर सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार होती.मात्र प्राधिकरणाने आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितल्याने सदर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मैदानाचा वापर स्थानिकांना करता येत नसल्याने तसेच सदर स्पोर्ट्स अकादमी कॉम्प्लेक्स भाडेपट्टीवर दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करून संकुलाचा तसेच एमपीटी मैदानाचा वापर त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी करतात असे या याचिकेत म्हटले होते.

Sports Complex
Goa Sport: मुंबईचा रांजणे अन् विदर्भाचा वाघ गोव्याकडून खेळणार

परशुराम सोनुर्लेकर

सदर एमपीटी मैदान हे एकमेव मैदान वास्कोतील तसेच स्थानिकासाठी असून तेही भारतीय विमानतळ प्राधिकरण काबीज करण्यासाठी पुढे आल्याने खेळाडू मैदानी खेळापासून वंचित राहिले आहे. तेव्हा समाज सेवक नजीर खान यांनी यावेळी उठवलेला आवाज योग्य आहे असे सोनुर्लेकर म्हणाले.

मनोज वळवईकर

एम पी टी मैदान विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित केल्यापासून सामान्य नागरिकांची खेळण्याची सोय काढून घेतलेली आहे. या मैदानावर विविध खेळाडू खेळून, सराव करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत. उदाहरण शदाब जकाती, नामदेव फडते, ब्रह्मानंद शंखवाळकर यासारखे खेळाडू या मैदानाने दिले आहे. तेव्हा हे मैदान सर्व सामान्य लोकांना पुन्हा बहाल करावे जेणेकरून सामान्य मुलांना सराव करून आपले कौशल्य दाखवायला मिळेल.

Sports Complex
Goa Sports: केपे शासकीय महाविद्यालयाचे क्रिडा क्षेत्रातील योगदान अतुलनीय

नितीन देसाई- शिक्षक

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण याने ताबा घेतलेले एम .पी. टी मैदान मुक्त करावे अशी मागणी नितीन फळदेसाई यांनी केली आहे .वास्को शहरात तरुणाना खेळण्यासाठी एकच मैदान उपलब्ध होते ,अशा परिस्थितीत वास्को शहरात असलेले एकमेव मैदान गोवा आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरण यांच्या ताब्यात देऊन तरुण वर्गावर अन्याय केला आहे. सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर हे मैदान तरुणांना उपलब्ध करून द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com