Goa Sport: मुंबईचा रांजणे अन् विदर्भाचा वाघ गोव्याकडून खेळणार

आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसमासाठी संघात आणखी दोन पाहुणे क्रिकेटपटू
Goa Sport: मुंबईचा रांजणे अन् विदर्भाचा वाघ गोव्याकडून खेळणार
Goa Sport: मुंबईचा रांजणे अन् विदर्भाचा वाघ गोव्याकडून खेळणारDainik Gomantak

पणजी: आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसमासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) मुंबईचा (Goa Cricket Association) शुभम रांजणे व विदर्भाचा श्रीकांत वाघ या मध्यमगती-तेज गोलंदाजाशी करार केला आहे. ते दोघेही संघातील पाहुणे क्रिकेटपटू असतील. गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ (Senior Cricket Association) आगामी मोसमात रणजी करंडक, तसेच सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे.

Goa Sport: मुंबईचा रांजणे अन् विदर्भाचा वाघ गोव्याकडून खेळणार
Goa: चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड वॉरीअर्सचा सत्कार

गतमोसमात खेळलेला मुंबईचा यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ केरकर हा संघातील तिसरा पाहुणा क्रिकेटपटू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमानुसार, एका संघास मोसमात तिघे पाहुणे क्रिकेटपटू करारबद्ध करता येतात.गतआठवड्यात मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई यांच्या देखरेखीखाली दिल्लीचे विकास टोकस व सुबोध भाटी, हरियानाचा दीपक पुनिया, तसेच श्रीकांत वाघ या तेज गोलंदाजांनी पर्वरी येथे चाचणी दिली होती. गोव्याचा संभाव्य सीनियर संघ शुक्रवारी (ता. 20) मोसमपूर्व सराव आणि स्पर्धा खेळण्यासाठी पुदुचेरीस जाणार आहे. त्यानिमित्त 26 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात आता रांजणे व वाघ यांची भर पडेल.

श्रीकांत डावखुरा वेगवान

श्रीकांत वाघ 32 वर्षांचा आहे. विदर्भाचा हा अष्टपैलू डावखुरा वेगवान गोलंदाज, डावखुरा फलंदाजही आहे. आयपीएल स्पर्धेत पुणे वॉरियर्सकडून खेळलेल्या श्रीकांतने नोव्हेंबर 2007 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत विदर्भाचे रणजी स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. विदर्भ व मध्य विभागातर्फे त्याने 64 प्रथम श्रेणी सामन्यांत 161 विकेट टिपल्या आहेत, त्याने चार वेळा डावात पाच गडी बाद केले. याशिवाय एक शतक आणि पाच अर्धशतकांसह 1646 धावाही केल्या आहेत. भारत अ संघाकडूनही तो खेळला आहे.

Goa Sport: मुंबईचा रांजणे अन् विदर्भाचा वाघ गोव्याकडून खेळणार
Goa: मालपे गोवा दरबार बनला भूत बंगला

शुभम मध्यमगती

रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळलेला 27 वर्षीय शुभम रांजणे अष्टपैलू आहे. फलंदाजीसह तो उपयुक्त मध्यमगती गोलंदाजही आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबईकडून शेवटचा रणजी सामना खेळलेल्या शुभमने 12 प्रथम श्रेणी सामन्यांत पाच गडी बाद केले असून चार अर्धशतकांच्या मदतीने 513 धावा केल्या आहेत. 11 जानेवारी 2021 रोजी तो मुंबईतर्फे टी-20 स्पर्धेत शेवटच्या वेळेस खेळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com