IPL 2023 Auction: आयपीएल लिलावात 'या' 3 स्पिनर्ससाठी सर्व फ्रँचायजी लावणार जोर...

पुढील वर्षांच्या आयपीएल हंगामासाठी डिसेंबरमध्ये 'या' दिवशी खेळाडुंचा लिलाव
IPL 2023 Auction
IPL 2023 AuctionDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 2023 च्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल 2023 मिनी ऑक्शन (IPL 2023 Auction) 23 डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास केरळमधील कोची शहरात होणार आहे. खेळाडुंच्या या लिलावात तीन स्पिनर्सची चर्चा सुरू असून या स्पिनर्सना आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच फ्रँचायजी जोर लावणार आहेत.

IPL 2023 Auction
IND vs BAN Test Day 1: पुजाराचे शतक हुकलं, अय्यरची वाटचाल शतकाच्या दिशेने...

आदिल रशिद

गतवर्षीच्या 15 व्या आयपीएल सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल (Yuvzendra Chahal) याने सर्वाधिक 27 विकेट घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. यंदाच्या होऊ घातलेल्या आयपीएलमध्ये इंग्लंडचा अनुभवी स्पिनर आदिल रशिद यंदाचा वर्ल्डकप चांगला ठरला होता. इंग्लंडला विश्वविजेता बनविण्यात त्याची भुमिका महत्वाची ठरली होती. रशिदने 6 सामन्यात 6.12 अॅव्हरेजसह 4 विकेट घेतल्या होत्या. आयपीएल 2023 ऑक्शनसाठी बेस प्राईस 2 कोटी रूपये ठेवली आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता सर्व फ्रँचायजीच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत. 2021 मध्ये रशिक किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. डेब्यू मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध 3 ओवर मध्ये 35 धावा दिल्या होत्या, त्यानंतर त्याला संधी मिळाली नव्हती.

अ‍ॅडम झांपा

ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अ‍ॅडम झाम्पा याने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये 13 विकेट घेऊनही त्याला गत लिलावात कुणीही खरेदी केले नव्हते. झांपा पहिल्यांदा 2016 मध्ये पुणे सुपर जायंट्सकडून खेळला होता. त्याने डेब्यू सीजनमध्ये सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरूद्ध सहा विकेट घेतल्या होत्या. 2020 मध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) मध्ये होता. तेव्हा 3 सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या सीझनसाठी झांपा याच्यावर मोठी बोली लागू शकते. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये त्याने 3 मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या.

IPL 2023 Auction
Argentina: जल्लोष अन् फक्त जल्लोष! अर्जेंटिना फायनलमध्ये जाताच लाखो चाहत्यांचा राजधानीत 'कल्ला'

शाकिब अल हसन

बांग्लादेशचा अनुभवी अष्टपैलु खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आजघडीला जगातील सर्वोत्तम स्पिनर्सपैकी एक आहे. 2011 पासून 2019 पर्यंत शाकिब कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) कडून खेळला आहे. त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएल करियरमध्ये त्याने 71 सामन्यात 63 विकेट घेतल्या आहेत. शाकिबची कामगिरी पाहता त्याच्यावरही सर्व फ्रँचायजींची नजर असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com