IND vs BAN Test Day 1: भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यातील दोन कसोटी सीरीजमधील पहिल्या कसोटी सामन्याला आज, बुधवारपासून सुरूवात झाली. आज सामन्याच्या पहिल्याच दिवशी, प्रथम फलंदाजी करताना भारताचा निम्मा संघ तंबुत परतला असून दिवसअखेर भारताच्या 278 धावा फलकावर लागल्या आहेत.
(India Vs Bangladesh Test Series)
पहिल्या दिवशी भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याचे शतक अवघ्या दहा धावांनी हुकले असून श्रेयस अय्यर सध्या 82 धावांवर नाबाद असून उद्या त्याच्या शतकाचीच आतुरता असणार आहे.
चटोग्राम येथील जहुर अहमद चौधरी स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात के. एल. राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दोन राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताला आश्वासक सुरवात करता आली नाही. भारताच्या 41 धावा झाल्या असताना ताईजुल इस्लाम याने शुभमन गिल याला 20 धावांवर आऊट केले. तर के. एल. राहुल याला 45 धावांवर खालीद अगहमद याने आऊट केले. विराट कोहली देखील केवळ एका धावेवर आऊट झाला.
ऋषभ पंतने 45 चेंडूत 46 धावा करताना धावगती वाढवली. पुजारा आणि अय्यर यांनी भारताचा डाव सांभाळला. पुजाराने 203 चेंडु खेळताना 90 धावा केल्या, त्यात 11 चौकार मारले. तो 19 व्या शतकापासून वंचित राहिला. अय्यरने 169 चेंडुत 10 चौकारांसह नाबाद 82 धावा केल्या आहेत. खेळ संपत आला असताना 85 आणि 90 व्या ओव्हरमध्ये अखेरच्या चेंडुवर मेहेदी हसन मिराज याने अक्षर पटेलला (14) आऊट करत भारतावर दबाव निर्माण केला आहे. दरम्यान, बांग्लादेशकडून ताईजुल याने 3 विकेट घेतल्या तर मिराजने दोन आणि खालिद अहमद याने एक विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.