Argentina: जल्लोष अन् फक्त जल्लोष! अर्जेंटिना फायनलमध्ये जाताच लाखो चाहत्यांचा राजधानीत 'कल्ला'

Video: अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर लाखो चाहत्यांनी रस्त्यावर उतरत जल्लोष केला.
Argentina Fans
Argentina FansDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: मंगळवारी रात्री कतारमध्ये फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिना संघाने क्रोएशियाला 3-0असे उपांत्य सामन्यात पराभूत केले. त्यामुळे अर्जेंटिनाने अंतिम सामन्यातही प्रवेश केला आहे. अर्जेंटिना संघाच्या या यशाने चाहतेही भारावले असून त्यांनी जल्लोष केला आहे.

आठ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना पोहचल्यानंतर अर्जेंटिनाची राजधानी असलेले ब्यूनस आयर्स शहर पूर्ण चाहत्यांनी भरले होते. अर्जेंटिनाने क्रोएशियाला पराभूत केल्यानंतर संघाचे चाहते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी संघाच्या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. जवळपास लाखो चाहत्यांची गर्दी ब्यूनस आयर्स रस्त्यावर होती.

ब्यूनस आयर्स पूर्ण अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी भरलेले फोटो-व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाकडून दिग्गज लिओनेल मेस्सीने पहिला गोल नोंदवला होता. त्याने 34 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत अर्जेंटिनाचे गोलचे खाते उघडले होते. त्यानंतर 22 वर्षीय ज्युलियन अल्वारेझने 39 व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल नोंदवला.

त्याचबरोबर दुसऱ्या हाफमध्ये मेस्सीच्या असिस्टवर अल्वारेझनेच अर्जेंटिनासाठी तिसरा आणि त्याचा सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. नंतर क्रोएशियाला सामन्यात पुनरागमन करणे कठीण गेले आणि त्यांचे अखेरीस वर्ल्डकप विजयाचे स्वप्न भंगले.

Argentina Fans
FIFA World Cup 2022: मोरोक्को इतिहास रचणार की फ्रान्स पुन्हा फायनलचं तिकीट मिळवणार?

36 वर्षांचा दुष्काळ संपवण्यची प्रतिक्षा

अर्जेंटिनाने यापूर्वी 2014 मध्येही फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यांना त्यावेळी जर्मनीकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर आता पुन्हा अंतिम सामना खेळण्याची संधी चालून आल्याने अर्जेंटिनाला यंदा विजेतेपदाची अपेक्षा असेल.

तसेच अर्जेंटिना फुटबॉल वर्ल्डकपमधील एकूण सहाव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 साली वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आता यंदा ते 36 वर्षांनंतर वर्ल्डकप विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

अर्जेंटिना अंतिम सामन्यात मोरोक्को किंवा फ्रान्स संघाशी दोन हात करतील. फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात विजयी ठरणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com